शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

'माझ्या मुलीची अन् बाळासाहेबांची शप्पथ घेऊन सांगतो, चुकीचं काहीच केलं नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 15:39 IST

Anil Parab reaches ED office in Mumbai : दुसरं समन्स आल्यानंतर अनिल परब आज ईडीच्या चौकशीला जात आहे. त्यांनी ईडीच्या चौकशीला जाण्यापूर्वी मीडियाशी संवाद साधला.

ठळक मुद्देमी ईडी कार्यालयात जात असून मी त्यांना त्यांच्या तपासात सहकार्य करणार असे देखील परब यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले. ईडीने  परब यांना शुक्रवारी दुसरे समन्स बजावले. त्यात मंगळवारी ११  वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याची सूचना केली.

राज्याचे परिवहन मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज मंगळवारी चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याबाबत दुसऱ्यांदा नोटीस बजावली होती. त्यानुसार परब ईडी कार्यालयात चौकशीसाठी पोहचले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या मुलीची शपथ घेऊन मी मागेच सांगितलं होतं की, मी काही चुकीचं केलेलं नाही. आताही तेच सांगत आहे. मी काहीच चुकीचं काम केलं नाही. मला दुसरं समन्स आल्याने मी ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहे, असं अनिल परब यांनी सांगितलं आहे. मी ईडी कार्यालयात जात असून मी त्यांना त्यांच्या तपासात सहकार्य करणार असे देखील परब यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

दुसरं समन्स आल्यानंतर अनिल परब आज ईडीच्या चौकशीला जात आहे. त्यांनी ईडीच्या चौकशीला जाण्यापूर्वी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मला ईडीचं दुसरं समन्स मिळालं आहे. मी चौकशीला जात आहे. शिवसेनाप्रमुख आणि मुलीची शपथ घेऊन मागे सांगितलं आहे की मी काहीही चुकीचं काम केलं नाही. चौकशीत जे प्रश्न विचारले जातील त्याचे उत्तर देईल. कशासाठी बोलावलं मला माहीत नाही. मला कोणतंही स्पष्ट कारण दिलं नाही. चौकशीला गेल्यावर कळेल. तिकडे गेल्यावर अधिकृतपणे कळेल, असं परब यांनी सांगितलं.

राज्याचे परिवहन मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज, मंगळवारी  चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याबाबत दुसऱ्यांदा नोटीस बजावली.  पण ते या चौकशीला हजर राहणार की गैरहजर याबाबत चर्चा सुरु होती. मात्र, आज ते ईडी कार्यालयात हजर राहिले आहेत. 

ईडीने  परब यांना शुक्रवारी दुसरे समन्स बजावले. त्यात मंगळवारी ११  वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याची सूचना केली. यापूर्वी २९ ऑगस्टला पहिल्यांदा दिलेल्या  नोटीसमध्ये केवळ ‘इन्व्हेस्टिगेशन पार्ट’ इतकेच नमूद करून चौकशीस हजर राहावे,  असे नमूद केले  होते. मात्र, परब यांनी पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे उपस्थित राहणे शक्य नसल्याचे त्यांनी नमूद केले होते. त्यांच्याकडे १०० कोटी वसुली प्रकरण व सचिन वाझेने एनआयए कोठडीतून लिहिलेल्या पत्रात बीएमसी कंत्राटदाराकडून वसुली करण्याबाबत परब यांनी सूचना केल्याचे नमूद केले आहे. त्यानुषंगाने ही चौकशी केली जाणार असल्याचे समजते.

टॅग्स :Anil Parabअनिल परबEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयMONEYपैसाBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे