शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीने लावून घेतला गळफास; सुसाईड नोटमध्ये लिहिले...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 08:59 IST

Suicide Case : जामखेड शहरातील घटना : चार महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह

ठळक मुद्देअजय कचरदास जाधव (वय ३२), शिल्पा अजय जाधव (वय २८, दोघेही रा. बीड रस्ता, जामखेड शहर) अशी आत्महत्या केलेल्या पती-पत्नीची नावे आहेत.

जामखेड : पत्नीपाठोपाठ पतीने ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जामखेड शहरात बुधवारी (दि. १२) दुपारी घडली. विशेष म्हणजे या दाम्पत्याचा चार महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. अजय कचरदास जाधव (वय ३२), शिल्पा अजय जाधव (वय २८, दोघेही रा. बीड रस्ता, जामखेड शहर) अशी आत्महत्या केलेल्या पती-पत्नीची नावे आहेत.

अजय व शिल्पा या दोघांचा चार महिन्यांपूर्वीच मोठ्या थाटात विवाह सोहळा झाला होता. शिल्पा जाधव हिने बुधवारी दुपारी बीड रस्त्याजवळील आदित्य गार्डन शेजारी राहत असलेल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची माहिती तिचा पती अजय जाधव यास समजली. त्यानंतर काही वेळातच अजय यानेही शहरातीलच मोरे वस्ती येथील त्याच्या पाण्याच्या प्लांटमधील ऑफिसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. पती-पत्नीने आत्महत्या का केली? याचे कारण समजू शकले नाही. यानंतर दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले. मयताचा भाऊ अभिषेक कचरदास जाधव याने जामखेड पोलीस ठाण्यात या घटनेची खबर दिली. आहे.यानंतर दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले. मयताचा भाऊ अभिषेक कचरदास जाधव याने जामखेड पोलीस ठाण्यात या घटनेची खबर दिली.पतीने लिहिली चिठ्ठी..पती अजय याने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. माझ्या आत्महत्येस मीच जबाबदार असून इतर कोणासही दोषी ठरवू नये, असे त्याने चिठ्ठीत लिहिले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAhmednagarअहमदनगरPoliceपोलिसmarriageलग्न