संतापजनक! रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पतीच्या मदतीसाठी पत्नीचा आक्रोश, बघे बनवत राहिले व्हिडीओ 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 01:55 PM2019-12-09T13:55:09+5:302019-12-09T13:57:15+5:30

गोळीबार झाल्यावर पीडितांच्या मदतीला येण्याऐवजी तिथे उपस्थित असलेल्या बघ्यांनी घटनेचा व्हिडीओ बनवले. 

husband lying in blood, Wife's outcry for help; But public Create a Video | संतापजनक! रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पतीच्या मदतीसाठी पत्नीचा आक्रोश, बघे बनवत राहिले व्हिडीओ 

संतापजनक! रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पतीच्या मदतीसाठी पत्नीचा आक्रोश, बघे बनवत राहिले व्हिडीओ 

googlenewsNext

पाटणा - एखादी दुर्घटना घडल्यावर संकटात सापडलेल्यांच्या मदतीला जाण्यापेक्षा त्यांचे फोटो, व्हिडीओ काढण्याची सवय अनेकांना झाली आहे. असाच एक लाजिरवाणा आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. बिहारमधील सीवान स्टेशनवर एका सपत्निक प्रवास करत असलेल्या एका प्रवाशावर दिवसाढवळ्या त्याच्या पत्नीसमोर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पतीला जवळ घेत पत्नी मदतीसाठी विनवणी करत राहिली, मात्र कुणीही तिची मदत करण्यासाठी पुढे आले नाही. अखेरीस त्या व्यक्तीने पत्नीच्या मांडीवरच वेदनेने विव्हळत प्राण सोडले. संतापजनक बाब म्हणजे हा प्रकार घडला असताना पीडितांच्या मदतीला येण्याऐवजी तिथे उपस्थित असलेल्या बघ्यांनी घटनेचा व्हिडीओ बनवले. 

मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्ती कोलकाता येथील व्यापारी असल्याचे समोर आले आहे. रविवारी दुपारी मोहम्मद फैझल हे आपली नवविवाहित पत्नी अंजुम खातून हिच्यासह सिवास रेल्वे स्टेशनवर कोलकाता येथे जाणाऱ्या बाघ एक्सप्रेसची वाट पाहत होते. त्याच दरम्यान, एका अज्ञात व्यक्तीने फैझल यांच्यावर मागून गोळीबार केला. त्यानंतर त्यांची पत्नी मदतीसाठी विनवण्या करत राहिली. मात्र तिथे उपस्थित असलेले लोक केवळ व्हिडिओ काढत राहिले. काही वेळाने एक पोलीस तिथे आला. मात्र तो केवळ चौकशी करून निघून गेला. तेवढ्यात फैजल यांनी प्राण सोडले. 

 फैजल यांचा सहा महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. ते आपल्या पत्नीला नेण्यासाठी कोलकात्याहून सीवान येथे आले होते. दरम्यान,  हत्येचे नेमके कारण समोर आलेले नाही. तसेच ज्या ठिकाणी हा गोळीबार झाला. त्या प्लॅटफॉर्मवर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याची बाब उघड झाली आहे.   

Web Title: husband lying in blood, Wife's outcry for help; But public Create a Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.