शहरं
Join us  
Trending Stories
1
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
2
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
3
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
4
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
5
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
6
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
7
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
8
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
9
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
10
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
11
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
12
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
13
Twisha Sharma : "हनिमूनलाच समर्थने माझ्या मुलीला..."; ट्विशाच्या वडिलांनी ढसाढसा रडत सांगितले जावयाचे कारनामे
14
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
15
भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक आली समोर; जपानच्या तंत्रज्ञानाने सज्ज; काय आहेत वैशिष्ट्ये?
16
बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले
17
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
18
IND vs AFG Test: जसप्रीत बुमराह OUT; रणजी गाजवणाऱ्या Auqib Nabi Dar साठी उघडणार टीम इंडियाचा दरवाजा?
19
"मराठी वारशाची शान घेऊन...", कान्स रेड कार्पेट गाजवल्यानंतर अशोक सराफ यांची पोस्ट
20
एकच सामना, एक SMS अन् IPL चा प्रवास संपला... बांगलादेशी क्रिकेटपटूने सांगितली दुःखद कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रिणीसोबत संबंध बनवण्यास भाग पाडते, नको नको ते करायला लावते; पत्नीच्या छळाला पती वैतागला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 13:13 IST

माझ्याकडील आवश्यक कागदपत्रे, रोकड आणि दागिनेही पत्नीने तिच्याजवळ ठेवले.

बंगळुरू - शहरातील अमृतहल्ली पोलीस स्टेशनला एक दुर्मिळ गुन्हा नोंद झाला आहे. एका व्यक्तीने त्याच्या पत्नीविरोधात पोलीस ठाण्यात धाव घेतली. दीर्घ काळापासून पती लैंगिक आणि मानसिक छळ सहन करत असल्याची ही तक्रार आहे. पत्नी अनैसर्गिक लैंगिक कृत्य करण्यासाठी भाग पाडते आणि विरोध केल्यावर माझा छळ करते असा आरोप पतीने केला आहे.

पतीने पोलीस स्टेशनला केलेल्या तक्रारीनुसार, पत्नी कायम मला अश्लील व्हिडिओ पाठवते आणि त्या व्हिडिओत दाखवलेल्या कृत्यासारखे तिच्यासोबत करण्यास भाग पाडते. इतकेच नाही तर पत्नी तिच्या मैत्रिणींसोबतही शारीरिक संबंध बनवण्याचा दबाव टाकते. पती पत्नी यांच्यातील खासगी क्षण मैत्रिणींसोबत शेअर करते असा पतीने आरोप केला आहे. 

त्याशिवाय पत्नीने लग्नाआधी आणि आताही परपुरुषांसोबत संबंध बनवल्याचे तिने उघडपणे सांगितले आहे. माझी आर्थिक परिस्थिती तिच्या उच्च राहणीमानाला मानवत नाही. पत्नीला दारू पिण्याची सवय आहे. मित्रांसोबत ती वारंवार वेळ घालवत असते असा आरोपही तक्रारदार पतीने पत्नीविरोधात केला आहे.

दरम्यान, ४ जुलै २०२४ रोजी कौटुंबिक मध्यस्थांमुळे छळ करणे कमी झाले. परंतु सासरच्यांनी मला मारहाण केली आहे. माझ्या घरातून माझा विश्वासघात करून बाहेर काढले. माझ्याकडील आवश्यक कागदपत्रे, रोकड आणि दागिनेही पत्नीने तिच्याजवळ ठेवले. जे ती परत देत नाही असंही पतीने पत्नीविरोधात म्हटलं आहे. पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस दोन्ही बाजूने या प्रकरणाचा तपास करत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी