Husband brutally murdered by wife in Virar | विरारमध्ये पत्नीने केली पतीची निर्घृण हत्या

विरारमध्ये पत्नीने केली पतीची निर्घृण हत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा : विरारमध्ये राहणाऱ्या २९ वर्षीय पत्नीने ३० वर्षीय पतीची घरगुती भांडणावरून शनिवारी मध्यरात्री पोटात कोणत्या तरी धारधार हत्याराने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विरार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेऊन  आरोपी पत्नीला अटक केली आहे.

विरारच्या पारस हॉस्पिटलच्या मागे असलेल्या जीवदानी अपार्टमेंटमध्ये पवार कुटुंब राहत होते. शनिवारी रात्री साडेतीन वाजेच्या सुमारास आरोपी पत्नी नेहा पवार (२९) हिने घरगुती भांडणाच्या कारणावरून पती लोकेश जगदीश पवार (३०) याची पोटात कोणत्या तरी धारदार हत्याराने भोसकून हत्या केली आहे. नेमकी ही हत्या कोणत्या कारणामुळे केली आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.

Web Title: Husband brutally murdered by wife in Virar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.