शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
4
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
5
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
6
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
7
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
8
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
9
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
10
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
11
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
12
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
13
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
14
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
15
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
16
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
17
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
18
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
19
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
20
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना सवाल; "मृत्यूला ५ वर्ष झाली, आणखी किती..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 05:47 IST

सर्व शक्यता पडताळण्यासाठी अगदी बारकाईने चौकशी करण्यात येत आहे, असे देशमुख यांनी न्यायालयाला सांगितले.

मुंबई - दिवंगत सेलिब्रिटी मॅनजेर दिशा सालियन हिच्या मृत्यूची चौकशी पोलीस आणखी किती काळ करणार आहेत? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी पोलिसांना केला. ‘मृत्यूला पाच वर्षे झाली आहेत आणि पोलिसांना याची खात्री करायची आहे की, ही आत्महत्या आहे की सदोष मनुष्यवधाचे प्रकरण आहे,’ असे न्यायालयाने म्हटले.

दिशा सालियन हिने दि. ८ जून २०२० रोजी मालाड येथील १४ व्या मजल्यावरील राहत्या घरातून उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली. सरकारी वकील मनकुवर देशमुख यांनी या प्रकरणाचा चौकशी अद्याप सुरू असल्याची माहिती न्यायालयाला दिली. ‘ अजून चौकशीच सुरू आहे? पाच वर्षे झाली. कोणाचातरी मृत्यू झाला आहे. ती आत्महत्या होती की सदोष मनुष्यवध आहे, हे निश्चित करायचे आहे,‘ असे न्या. एस. एस. गडकरी व आर. आर. भोसले यांच्या खंडपीठाने म्हटले.

सर्व शक्यता पडताळण्यासाठी अगदी बारकाईने चौकशी करण्यात येत आहे, असे देशमुख यांनी न्यायालयाला सांगितले. दिशा सालियनवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिचे वडील सतीश सालियन यांनी केला आहे. तिच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी आणि आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सतीश सालियन यांनी केली आहे. यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी या याचिकेत मध्यस्थी करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला. कोणतेही आदेश देण्यापूर्वी आधी आपले म्हणणे ऐकून घ्यावे, अशी विनंती आदित्य ठाकरे यांनी न्यायालयाला केली आहे. सतीश सालियन यांनी दाखल केलेली याचिका खोटी, क्षुल्लक आणि प्रेरित आहे, असा आदित्य ठाकरे यांनी अर्जात म्हटले आहे. 

न्यायालयातील युक्तिवाद
देशमुख यांनी न्यायालयाला सांगितले की, याचिकाकर्ते आणि त्यांच्या पत्नीचा जबाब अनेकवेळा पोलिसांनी नोंदविला आहे. त्यावेळी त्यांनी कोणावरही संशय नसल्याचे सांगितले होते. आता पाच वर्षांनी वडिलांनी याचिका दाखल केली. पोलिस जबाबाच्या प्रती, तपासाची कायद्याने परवानी असलेली कागदपत्रे वडिलांना का देत नाही? पीडितेचे वडील असल्याने त्यांना ती कागदपत्रे द्यावीत, असे म्हणत न्यायालयाने पुढील सुनावणीत सरकारी वकिलांना सतीश सालियन यांना कागदपत्रे देण्याबाबत पोलिसांची भूमिका काय आहे, हे स्पष्ट करण्याचे निर्देश दिले.

English
हिंदी सारांश
Web Title : High Court questions police on Disha Salian's suicide case delay.

Web Summary : Bombay High Court questions the prolonged investigation into Disha Salian's death, five years on. The court seeks clarity on whether it's suicide or culpable homicide, following allegations by Salian's father, who demands a CBI investigation and implicates Aditya Thackeray, who denies the accusations.
टॅग्स :High Courtउच्च न्यायालयDisha Salian Caseदिशा सालियान मृत्यू प्रकरणAaditya Thackerayआदित्य ठाकरेSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूत