शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

मुख्यमंत्र्यांपूर्वी गृहमंत्र्यांना धमकी! दुबई आणि दिल्लीहून फोन, तक्रारीनंतर चौकशी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 21:06 IST

वेगवेगळ्या नंबर वरून एकूण पाच वेळा फोन करून  दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने अनिल देशमुख यांना  संभाल के रहना, अशी धमकी दिली आहे.  

ठळक मुद्देया प्रकरणाची तक्रार  नागपूर पोलिसांकडे करण्यात आली असून  पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. 

नागपूर : मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांचा मातोश्री बंगला  उडवून  देण्याच्या  धमकीच्या फोन पूर्वी  राज्याचे गृहमंत्री  अनिल देशमुख  यांना  दुबई आणि दिल्लीहून  धमकीचे फोन आले. वेगवेगळ्या नंबर वरून एकूण पाच वेळा फोन करून  दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने अनिल देशमुख यांना  संभाल के रहना, अशी धमकी दिली आहे.  या प्रकरणाची तक्रार  नागपूर पोलिसांकडे करण्यात आली असून  पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. 

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेला मातोश्री बंगला उडवून देण्याची धमकी देणारा फोन रविवारी रात्री दुबईहून आल्याचे उघड झाल्यानंतर सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली. मात्र तत्पूर्वीच शनिवारी रात्री १० वाजून २४ मिनिटांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दुबईहून चार वेळा फोन आले. हे चारही कॉल गृहमंत्री देशमुख यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोठेकर यांनी उचलले. आरोपी कॉलरने आपण दुबईतून बोलत असल्याचे सांगून गृहमंत्री देशमुख यांना सांभाळून राहा, अन्यथा गंभीर परिणाम होतील, अशी धमकी दिली. त्यानंतर रविवारी दुपारी १.३४ वाजता गृहमंत्री देशमुख यांच्याशी सिव्हिल लाईन मधील बंगल्यावरच्या लँडलाईनवर फोन आला. कॉलरने आपले नाव संजयकुमार सिंग सांगितले आणि पुन्हा गृहमंत्री यांना धमकी दिली. देशमुख यांनी रविवारी रात्री पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना या धमकीच्या फोनची माहितीवजा तक्रार देण्यात आली. थेट गृहमंत्र्यांनाच फोन आल्यामुळे पोलिसांनी तातडीने चौकशी सुरू केली आहे.  नमूद दोन्ही क्रमांक कुठले आहेत, त्याचा शोध घेतला जात आहे.आता काही सांगणार नाही : पोलीस आयुक्त यासंबंधाने अधिक माहिती मिळवण्यासाठी लोकमतने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत माहिती देण्याचे टाळले. आपण यावेळी या प्रकरणाच्या संबंधाने काहीही बोलू इच्छित नाही, असे ते म्हणाले.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

मुंबईची तुलना POK शी करणं कंगनाला भोवणार?, सामान्य मुंबईकराची पोलीस ठाण्यात तक्रार

 

सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला

 

Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा

 

बापरे! ९० हजाराहून अधिक तरुणांनी २०१९ मध्ये केली आत्महत्या, पहा NCRB चा अहवाल

 

महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात वाढ, सीआयडीचा क्राईम इन महाराष्ट्र २०१८ अहवाल जाहिर

 

मोठी बातमी! अखेर रियाचा भाऊ शोविक आणि मिरांडाला एनसीबीने केली अटक

 

फ़ुटबॉलपटूविरोधात खळबळजनक आरोप, मुंबईतील तरुणीने केली बलात्काराचा तक्रार

 

मातोश्री उडवून देण्याच्या धमकीनंतर दाऊद इब्राहिमच्या प्रतिमेचे एनएसयूआयतर्फे दहन

 

वेगळं वळण : रियाने सुशांतच्या बहिणीविरोधात केली मुंबई पोलिसात तक्रार, हे आहे कारण!

 

 

 

टॅग्स :Dawood Ibrahimदाऊद इब्राहिमnagpurनागपूरPoliceपोलिसAnil Deshmukhअनिल देशमुखUddhav Thackerayउद्धव ठाकरेChief Ministerमुख्यमंत्रीMaharashtraमहाराष्ट्र