शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

निर्दयी बापाचं काळीज! चार वर्षाच्या मुलीच्या रडण्याला कंटाळून केली हत्या, मृतदेह टाकला टेम्पोत 

By पूनम अपराज | Updated: October 30, 2020 18:21 IST

Murder : निर्दोष चमुकलीचा दोष इतकाच होता की, ती चिमुकली घराबाहेर पडलेल्या आई आणि भावाच्या आठवणीत रडत होती. याला कंटाळून वडिलांनी मुलीचा गळा दाबला आणि तिची हत्या केली. 

ठळक मुद्दे वासुदेव गुप्ता खोडाच्या नेहरू गार्डन भागात राहतो. तो मूळचा सुलतानपूरचा असून तो टेम्पो चालवितो. त्याची पत्नी स्पा सेंटरमध्ये काम करते. सुमारे वीस दिवसांपूर्वी पत्नी आपल्या तीन वर्षाच्या मुलासह घर सोडून गेली.

गाझियाबादच्या साहिबाबादमधील खोडाच्या नेहरू गार्डन भागात वडिलांनी गुरुवारी आपल्या चार वर्षाच्या मुलीची हत्या केली. निर्दोष चमुकलीचा दोष इतकाच होता की, ती चिमुकली घराबाहेर पडलेल्या आई आणि भावाच्या आठवणीत रडत होती. याला कंटाळून वडिलांनी मुलीचा गळा दाबला आणि तिची हत्या केली. यानंतर आरोपी बापाने टेम्पोमध्ये मुलीचा मृतदेह टाकला आणि पत्नीचा शोध घेण्यासाठी नोएडाच्या दिशेने गेला. दरम्यान, आरोपीच्या धाकट्या भावाने बहीण गायब झाल्याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. नोएडा पोलिसांनी आरोपी वडिलांना सेक्टर -11 मधून पकडून त्याला खोडा पोलिसांच्या स्वाधीन केले. वासुदेव गुप्ता खोडाच्या नेहरू गार्डन भागात राहतो. तो मूळचा सुलतानपूरचा असून तो टेम्पो चालवितो. त्याची पत्नी स्पा सेंटरमध्ये काम करते. सुमारे वीस दिवसांपूर्वी पत्नी आपल्या तीन वर्षाच्या मुलासह घर सोडून गेली.

तिने आपल्या चार वर्षाची मुलगी आदितीला घरी सोडले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी अदिती आई आणि भावाच्या आठवणीने रडत होती. वासुदेव मुलगी शांत करत होता पण मुलगी गप्प बसत नव्हती. रागाच्या भरात वासुदेवने मुलीचा गळा आवळून तिचा मृत्यू झाला. यानंतर वासुदेव आपल्या टेम्पोमध्ये मुलीचा मृतदेह घेऊन पत्नीचा शोध घेण्यासाठी निघाला. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वासुदेवचा भाऊ त्याच्या घरी आला आणि घरी दोघेही दिसले नाहीत. त्यानंतर त्याने दोघेही बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना दिली.टेम्पोमधून मुलीचा मृतदेह फिरवत होता टेम्पोसह आरोपीला पोलिसांनी नोएडा सेक्टर -11 मध्ये अटक केली. पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली असता मुलीचा मृतदेह त्यात सापडला. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे. यानंतर नोएडा पोलिसांनी आरोपी वडिलांना खोडा पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस स्टेशन खोडाचे एसएचओ असलम यांनी दिली. मुलीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे. पोलिस मुलाच्या आईचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Murderखूनdelhiदिल्लीPoliceपोलिसArrestअटक