शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
2
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
3
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
4
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
5
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
6
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
7
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
8
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
9
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
10
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
11
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
12
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
13
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
14
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
15
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
16
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
17
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
18
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
19
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
20
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
Daily Top 2Weekly Top 5

Video : खाकीवर उगारला हात! महिलेने वाहतूक पोलिसाची पकडली कॉलर अन् केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2020 13:22 IST

Assualting to Traffic Police : याप्रकरणी  एल.टी.मार्ग पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती एल टी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम यांनी लोकमतशी बोलताना दिली.

ठळक मुद्दे याप्रकरणी एल टी मार्ग पोलिसांनी ठोकल्या बेडया आहेत. सादविका रमाकांत तिवारी (वय -30) राहणार मशीद बंदर आणि मोहसीन निजामउददीन खान (26) राहणार भेंडी बाजार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

मुंबई : काळबादेवी परिसरात कॉटन एक्सचेंज नाका येथे महिलेची दादागिरी पाहायला मिळाली. या महिलेने एका वाहतूक पोलिसाला शिव्या दिल्याचा आरोप लावत मारहाण केली. चक्क महिलेने कॉलर पकडून कानशिलात लगावली. याप्रकरणी एल टी मार्ग पोलिसांनी ठोकल्या बेडया आहेत. सादविका रमाकांत तिवारी (वय -30) राहणार मशीद बंदर आणि मोहसीन निजामउददीन खान (26) राहणार भेंडी बाजार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कालची घटना आहे. कॉटन एक्सचेंज नाका येथे ट्रॅफिक हवालदार आपले कर्तव्य बजावत असताना या सादविका  या महिलेसोबत एक इसम होता. त्याने हेल्मेट घातलेले नव्हते. त्यामुळे या महिलेने वाद करुन वाहतूक हवालदार एकनाथ श्रीरंग पार्टे यांना मारहाण केली. त्यांची नेमणूक काळबादेवी ट्राफिक डिव्हिजन येथे करण्यात आली होती. याप्रकरणी  एल.टी.मार्ग पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती एल टी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम यांनी लोकमतशी बोलताना दिली. सादविका आणि खान यांना न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जाण्यात आले आहे.  

या वादाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडिओत महिला वाहतूक पोलिसाने महिलेला अब्रू उत्पन्न करणारी शिवी घातली असल्याचं म्हणत आहे. त्यामुळे संतापलेल्या महिलेने रस्त्यावर लोकांना जमवून वाहतूक पोलिसांच्या श्रीमुखात लगावली. 

काय आणि कसं घडलं हे प्रकरण ?दि. २३/१०/२०२० रोजी दुपारी १५ १५ . दरम्यान काळबादेवी वाहतूक विभागात कार्यरत असलेले पोलीस हवालदार एकनाथ पार्टे हे कॉटन एक्सचेंज चौक, सुरती हंटिलसमोर, काळबादेवी या ठिकाणी दैनंदिन कर्तव्य बजावित होते. त्यादरम्यान एक मोटार सायकलस्वार विना हेल्मेट मोटार सायकल चालवून वाहतूक नियमाचे उल्लंघन करीत असल्याने त्यांन विना हेल्मेटची कारवाई करण्यासाठी थांबविले. त्यावेळी पुरुष मोटार सायकलस्वार व महिला यांनी पोलिसांशी हुज्जत घालावयास सुरुवात केली. पार्टे यांनी त्यांना सर" व "मॅडम" असे संबोधून कोणतीही शिवीगाळ व अपशब्द उच्चारलेला नसताना देखील पोलिसाने अपशब्द व शिवीगाळ केल्याचा खोटा आरोप महिला करु लागली. नंतर महिला त्यांना धक्काबुक्की करुन मारहाण करु लागली. या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. 

पोलीस हवालदार पार्टे यांना अपशब्द वापरून धक्काबुक्की व मारहाण करीत असताना देखील पार्टे यांनी स्वत:चा संयम ढळू न देता कोणतीही अर्वाच्च भाषा न वापरता आरोपी महिलेला मॅडम" असे संबोधल्याचे दिसून येत आहे. त्यांनी पुढील कायदेशीर कारवाई करीता महिला पोलीस अमलदारांना बोलावून घेतले. ही घटना पडत असताना पोलीस पार्टे यांनी आरोपी महिलेविरुध्द कोणतेही गैरवर्तन झालेले दिसून येत नाही.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसMumbaiमुंबईPoliceपोलिस