शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 10:23 IST

दुकानदारांचे क्यूआर कोड बदलून स्वत:च्या बँक खात्यात वळवणाऱ्या सुरक्षारक्षकाला खार पोलिसांनी अटक केली.

मुंबई : दुकानदारांचे क्यूआर कोड बदलून स्वत:च्या बँक खात्यात वळवणाऱ्या सुरक्षारक्षकाला खार पोलिसांनी अटक केली. शिवओम दुबे (२२) असे आरोपीचे नाव असून, त्याने क्यूआर कोड प्रिंट केले होते. हे कोड दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरातील दुकानांसह अनेक स्टॉल्सच्या बाहेरील वैध क्यूआर कोडवर चिकटवले होते. कारवाईदरम्यान पोलिसांनी त्याची तीन बँक खाती गोठवून ४९ हजार रुपये हस्तगत केले आहेत. 

दिनेश गुप्ता (५६) याची खार पश्चिमेतील पी.डी. हिंदुजा मार्गावर पानाची टपरी आहे. काही दिवसांपासून ग्राहकांनी दुकानातील क्यू आर कोडवर पाठवलेले पैसे त्याच्या बँक खात्यात जमा होत नव्हते. तांत्रिक समस्या असल्याचे समजून त्याने दुर्लक्ष केले होते.  

आतापर्यंत अनेकांना गंडविले१२ जुलै रोजी ग्राहकाचे पैसे खात्यात जमा झाले नाही. त्यामुळे त्याने स्टॉलबाहेरील क्यूआर कोड तपासला त्यावर भलताच क्यूआर कोड चिकटविल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने तो कोड स्कॅन केला तेव्हा त्यावर शिवम दुबे हे नाव दिसले. गुप्ता याने शेजारील दुकानदार लक्ष्मी यादव हिला फसवणुकीबाबत सांगितले असता तिलाही ग्राहकांचे पैसे मिळत नसल्याचे समोर आले. तिनेही तिच्या दुकानाबाहेर कोड स्कॅन केला असता त्यावरही शिवम दुबे याचेच नाव असल्याचे स्पष्ट झाले. 

यू ट्यूबवरून मिळाली आयडिया शिवकुमार दुबे हा १० वी पास असून, त्याने यू ट्यूबवरील व्हिडीओ पाहून फसवणुकीसाठी स्वत:च्या बँकेचे कोड छापले होते.  गेल्या दोन महिन्यांपासून त्याने विशेषतः रेल्वेजवळील दुकाने आणि भाजीपाला विक्रेत्यांना लक्ष्य केले. त्याला न्यायालयाने २१ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.  त्याने आतापर्यंत किती जणांना अशा प्रकारे गंडविले याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई