नुकताच मुलीचा पहिला वाढदिवस झालेला अन् वडिलांची आत्महत्या; महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाने संपवली जीवनयात्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2021 09:34 PM2021-02-28T21:34:15+5:302021-02-28T23:37:41+5:30

The girl's first birthday is her father's suicide : सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,उमेश दिक्षीवंत हे महावितरणच्या धायरी शाखेत कार्यरत होते.

The girl's first birthday is her father's suicide; MSEDCL's senior technician took the gallows | नुकताच मुलीचा पहिला वाढदिवस झालेला अन् वडिलांची आत्महत्या; महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाने संपवली जीवनयात्रा

नुकताच मुलीचा पहिला वाढदिवस झालेला अन् वडिलांची आत्महत्या; महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाने संपवली जीवनयात्रा

googlenewsNext
ठळक मुद्देउमेश प्रकाश दिक्षीवंत  (वय :३२, रा. फिनोलेक्स कॉलनी, काळेवाडी, पिंपरी चिंचवड, पुणे) असे आत्महत्या केलेल्या महावितरण कर्मचाऱ्याचे नाव आहे.

धायरी: सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे -धायरी येथील महावितरणच्या कार्यालयात एका वरिष्ठ तंत्रज्ञाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. उमेश प्रकाश दिक्षीवंत  (वय :३२, रा. फिनोलेक्स कॉलनी, काळेवाडी, पिंपरी चिंचवड, पुणे) असे आत्महत्या केलेल्या महावितरण कर्मचाऱ्याचे नाव आहे.

सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,उमेश दिक्षीवंत हे महावितरणच्या धायरी शाखेत कार्यरत होते. सध्या त्यांची रात्रपाळीत ड्युटी असल्याने ते नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री ११ वाजता कामावर हजर झाले होते. नेहमीप्रमाणे इतर कर्मचारी कामात मग्न असताना दिक्षीवंत हे कार्यालयाशेजारी असणाऱ्या गोडावून मध्ये गेले. सकाळी सातच्या दरम्यान एक कर्मचारी गोडाऊनमध्ये काही कामानिमित्त जात असताना त्यांना आतून दरवाजा बंद असल्याचे लक्षात आले. त्यावेळी त्यांनी आवाज दिला असता दिक्षीवंत यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने त्यांच्या सहकाऱ्याने खिडकीतून पाहिले असता त्यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. कर्मचाऱ्यांनी तातडीने वरिष्ठांना याबाबत माहिती कळविली. त्यानंतर पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता त्यांनी छताला असणाऱ्या लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. याबाबत सिंहगड रस्ता पोलीस अधिक तपास करीत आहेत.



मूळचे उस्मानाबाद जिल्हयातील असणारे उमेश दिक्षीवंत हे कोल्हापूरवरून मागील दोन वर्षांपूर्वी बदली होऊन महावितरणच्या धायरी शाखेत रुजू झाले होते.
मनमिळावू स्वभावाचे असणारे दिक्षीवंत यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले असून ते काळेवाडी परिसरात आपल्या पत्नीसमवेत राहत होते. त्यांना एक वर्षाची मुलगी असून तिचा पहिला वाढदिवस नुकताच झाला होता.  दिक्षीवंत यांनी आत्महत्या केल्याने कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली. त्यांनी आत्महत्या करण्याइतके टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप समजू शकले नाही.   

Web Title: The girl's first birthday is her father's suicide; MSEDCL's senior technician took the gallows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.