गर्लफ्रेंडने लावला लग्नाचा तगादा; विवाहित बॉयफ्रेंडने अपहरण करून 'असा' काढला काटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 22:01 IST2021-05-31T21:59:29+5:302021-05-31T22:01:57+5:30
Murder Case : गुन्हा लपवण्यासाठी त्याने तबस्सुमचा मृतदेह कालव्यामध्ये फेकून दिला होता.

गर्लफ्रेंडने लावला लग्नाचा तगादा; विवाहित बॉयफ्रेंडने अपहरण करून 'असा' काढला काटा
उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यातील एका विवाहित पुरुषाने त्याच्या २४ वर्षीय प्रेयसीचे अपहरण करून हत्या केली. ही धक्कादायक घटना जानसठ परिसरातील कवाल गावची आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी तैमून नावाच्या पुरुषाने त्याची प्रेयसी तबस्सुमची हत्या केली. तरुणी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी गुन्हा दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी चौकशीअंती आरोपी तैमूरला अटक केली.
पोलीस अधिकारी डी.के त्यागी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तबस्सुम तैमूरवर लग्नासाठी दबाव आणत होती. मात्र, त्याचं लग्न झालेलं होतं म्हणजेच तो विवाहित होता. त्यामुळे दोघांत खटके उडत होते. सततच्या वादाला कंटाळून तैमूरने तबस्सुमचे अपहरण केले आणि तिची हत्या केली. त्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी त्याने तबस्सुमचा मृतदेह कालव्यामध्ये फेकून दिला होता.
रात्री उशिरा पत्नी फोनवर बोलत होती शेजाऱ्याशी; पतीने मज्जाव केल्याने त्याच्यावर केला जीवघेणा हल्लाhttps://t.co/FxQymlcntE
— Lokmat (@MiLOKMAT) May 31, 2021
पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केल्यानंतर तैमूरबाबत त्यांना माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी चौकशीसाठी तैमूरला ताब्यात घेतले. सुरुवातीला चौकशीमध्ये पोलिसांना तैमूर माहिती देत नव्हता. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यानं गुन्ह्याची कबुली देत पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तबस्सुमचा मृतदेह कालव्यात फेकल्याची माहितीही आरोपीने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तबस्सुमचा मृतदेह शोधला आणि श्वविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.