वाढदिवसाच्या पार्टीत तरुणीवर बलात्कार; मैत्रिणीसह तिघांना ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 06:45 IST2024-09-09T06:43:20+5:302024-09-09T06:45:06+5:30

दुसऱ्या दिवशी मुलगी घरी न आल्याने पालकांनी भूमिकाशी संपर्क केला. त्यावेळी तुमची मुलगी मद्यप्राशन करून पडल्याचे तिने सांगितले.

Girl raped at birthday party; The three were shackled along with their girlfriend | वाढदिवसाच्या पार्टीत तरुणीवर बलात्कार; मैत्रिणीसह तिघांना ठोकल्या बेड्या

वाढदिवसाच्या पार्टीत तरुणीवर बलात्कार; मैत्रिणीसह तिघांना ठोकल्या बेड्या

बदलापूर -  मैत्रिणीकडे बदलापूर वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या २२ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बदलापूरमध्ये घडली. याप्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तरुणीला गुंगीचे औषध देणारी मैत्रीण आणि आणि तिच्या दोन मित्रांना अटक केली आहे.

बदलापूर पूर्वमधील पीडित तरुणीची शिरगाव परिसरातील भूमिका मेश्राम या तरुणीसोबत ओळख झाली. दोन दिवसांपूर्वी भूमिका हिने तिच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी तिच्या दोन मित्रांना आणि पीडितेला घरी बोलावले होते. रात्री पार्टीनंतर भूमिका हिने पीडितेच्या पेयात गुंगीचे औषध टाकले. बेशुद्ध अवस्थेमधील तरुणीवर भूमिका हिच्या घरी एकाने बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी मुलगी घरी न आल्याने पालकांनी भूमिकाशी संपर्क केला. त्यावेळी तुमची मुलगी मद्यप्राशन करून पडल्याचे तिने सांगितले.

वैद्यकीय चाचणीत बलात्कार निष्पन्न पालकांसोबत घरी परतलेल्या पीडितेला शुद्ध आल्यानंतर बलात्कार झाल्याचे तिच्या लक्षात आले. याबाबत तिने पालक आणि पोलिसांना माहिती देताच तिची वैद्यकीय चाचणी केली. यामध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले, मात्र, हा बलात्कार एका मित्राने केला, की दोघांनी? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी पीडितेला गुंगीचे औषध देणारी मैत्रीण भूमिका मेश्राम, साताऱ्याहून आलेला शिवम राजे (वय २२) आणि संतोष रुपवते (४०) या तिघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या तिघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.

Web Title: Girl raped at birthday party; The three were shackled along with their girlfriend