शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
3
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
4
IPL 2024 DC vs MI: मुंबईने टॉस जिंकला! हार्दिकने रिषभच्या मनासारखा निर्णय घेतला, पृथ्वीला विश्रांती
5
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
6
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
7
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
8
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
9
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
10
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
11
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
12
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
13
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
14
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
15
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
16
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
17
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
18
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
19
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
20
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला

लग्नापूर्वी तरुणीला गाठावे लागले पोलीस ठाणे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2020 7:53 AM

नवरदेवाने घातला साडेपाच लाखांचा गंडा; भेटवस्तू पाठविण्याच्या नावाखाली फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जोडीदाराच्या शोधात असताना, विवाह संकेतस्थळावरून तरुणासोबत ओळख झाली. संवाद वाढला. लग्नाचे स्वप्न रंगविण्यास सुरुवात झाली. मात्र लग्नापूर्वीच होणारा नवरदेव साडेपाच लाखांचा गंडा घालून नॉट रिचेबल झाल्याने तरुणीला पोलीस ठाणे गाठण्याची वेळ ओढावली. याप्रकरणीव्ही. पी. रोड पोलीस अधिक तपास करत आहेत.

गिरगाव परिसरात ३६ वर्षीय रेश्मा आईसोबत राहते. जून महिन्यात लग्नासाठी विवाह संकेतस्थळावर तिने माहिती शेअर केली. त्यानंतर तिला मुलांच्या रिक्वेस्ट येत असताना, ४ सप्टेबर रोजी एकाचा व्हॉट्सअ‍ॅप संदेश धडकला. त्याने त्याचे नाव संदीप राऊत सांगून वाराणसीचा रहिवासी असल्याचे सांगितले. अमेरिकेत त्याची स्वत:ची कंपनी असल्याचे सांगितले.दोघांमध्ये संवाद वाढला. रेश्मानेही त्याच्यासोबत लग्नाचे स्वप्न रंगविले. ७ सप्टेंबर रोजी त्याने ५७ हजार रूपयांच्या वस्तू खरेदी केल्याचे सांगितले. आणि ते कार्गोने पाठवत असल्याचे सांगून, लिंक पाठवली. गिफ्टचे फोटोही पाठविले.

त्यानंतर कुरियर कंपनीचा मेल धडकला. ८ तारखेला कुरियर आल्याचे सांगून, त्यासाठी आधी ५७ हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार तिने पैसे भरले. पुढे दुसरा कॉल आला. त्यात पार्सलमध्ये पैसे असल्याचे सांगून, आणखीन दीड लाख भरण्यास सांगितले.

त्यानंतर वेगवेगळी कारणे देत तरुणीकड़ून ५ लाख ६४ हजार रुपये उकळले. पुढे आणखी ९ लाख रुपये भरावे लागणार असल्याचे सांगितले. तिने संदीपला पैसे नसल्याचे सांगताच त्याने विवाह संकेत स्थळावरील त्याचे अकाउंट डिलीट करण्यास सांगितले. तरुणीने भरलेल्या पैशांबाबत विचारणा करताच त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर मोबाइल बंद करून ठेवला.फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार शनिवारी याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिस