शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

बनावट GST अधिकारी बनून ज्वेलरी शॉपवर दरोडा; १५ मिनिटांत २० लाखांचे दागिने लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 14:09 IST

धनवार बाजारपेठेत भरदिवसा सहा दरोडेखोरांनी बनावट जीएसटी (GST) अधिकारी बनून एका ज्वेलरी शॉपला टार्गेट केलं.

झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे, ज्यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. धनवार बाजारपेठेत भरदिवसा सहा दरोडेखोरांनी बनावट जीएसटी (GST) अधिकारी बनून एका ज्वेलरी शॉपला टार्गेट केलं. आरोपींनी स्वतःची ओळख अधिकारी म्हणून करून दिली आणि दुकानात घुसून २० लाख रुपयांहून अधिक किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लुटून पळ काढला.

मिळालेल्या माहितीनुसार, दरोडेखोर कारमधून आले होते. त्यापैकी एक जण पोलिसांच्या गणवेशात होता, तर दुसरा अधिकारी बनून आला होता. या गुन्हेगारांनी बंगाली कारागिरांकडून कागदपत्रं तपासण्याच्या बहाण्याने कपाटं उघडायला लावली आणि त्यात ठेवलेले मौल्यवान दागिने आपल्या पिशव्यांमध्ये भरले. ही संपूर्ण घटना अवघ्या १५ मिनिटांत पार पडली.

बनावट जीएसटी अधिकारी असल्याचं उघड

दागिने लुटल्यानंतर आरोपींनी मुख्य कारागीर होरिहर साव यांनाही आपल्यासोबत गाडीत बसवून नेलं. मात्र देवघर जिल्ह्यातील देवीपूर येथे त्यांना कारमधून उतरवून दरोडेखोर पसार झाले. कारागिराला सोडून दिल्यानंतर हे सर्वजण बनावट जीएसटी अधिकारी असल्याचं उघड झालं. त्यानंतर तातडीने धनवार पोलीस ठाण्याला याची माहिती देण्यात आली.

CCTV मध्ये कैद झाले चेहरे

ही संपूर्ण घटना दुकानात आणि परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींच्या हालचाली आणि त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत, ज्यामुळे पोलिसांना तपासात मोठी मदत मिळत आहे. धनवार पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवून त्यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Fake GST officers rob jewelry store, loot ₹20 lakh.

Web Summary : In Jharkhand, six robbers posing as GST officers targeted a jewelry shop, stealing over ₹20 lakh worth of gold and silver in 15 minutes. They left a kidnapped artisan, later released, revealing the fraud. CCTV footage aids police investigation.
टॅग्स :JharkhandझारखंडCrime Newsगुन्हेगारीMONEYपैसाPoliceपोलिस