३ बहिणींच्या मृत्यूमागच्या 'कोरियन कनेक्शन'चं गूढ उकलणार? वडिलांनी विकलेला फोन केला जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 12:57 IST2026-02-12T12:57:18+5:302026-02-12T12:57:43+5:30
तीन बहिणींच्या वडिलांचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे, जो त्यांनी घटनेच्या साधारण दोन आठवड्यांपूर्वी एका दुकानदाराला विकला होता.

३ बहिणींच्या मृत्यूमागच्या 'कोरियन कनेक्शन'चं गूढ उकलणार? वडिलांनी विकलेला फोन केला जप्त
गाझियाबादमध्ये आत्महत्या करणाऱ्या तीन बहिणींच्या वडिलांचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे, जो त्यांनी घटनेच्या साधारण दोन आठवड्यांपूर्वी एका दुकानदाराला विकला होता. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हा फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या तिन्ही बहिणींच्या आत्महत्येचा संबंध एखाद्या 'टास्क-बेस्ड' ऑनलाइन कोरियन गेमशी होता का? हे शोधण्यासाठी फोनमधील डेटा रिकव्हर करणं अत्यंत आवश्यक असल्याचं पोलिसांचं मानणं आहे.
अनेकांचा असा दावा आहे की, या तिन्ही मुलींना अशा प्रकारच्या गेमचं व्यसन जडलं होतं. ट्रान्स हिंडनचे डीसीपी निमिष पाटील यांनी पीटीआयला सांगितलं की, प्राथमिक तपासात मुली कोणत्याही कोरियन एपचा वापर करत असल्याचे संकेत अद्याप मिळालेले नाहीत. ४ फेब्रुवारी रोजी निशिका (१६), प्राची (१४) आणि पाखी (१२) या तीन बहिणींनी त्यांच्या अपार्टमेंटच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. यानंतर त्यांचे वडील चेतन कुमार यांनी दावा केला होता की, त्यांच्या मुली गेल्या तीन वर्षांपासून एक कोरियन गेम खेळत होत्या आणि त्याचमुळे त्यांनी शाळेत जाणंही सोडलं होतं.
जमिनीवर 'कोरियन स्टाईल'ची विचित्र चिन्ह... ३ बहिणींच्या खोलीत काय सापडलं? धक्कादायक खुलासा
खरं की खोटं... वडिलांच्या प्रत्येक दाव्याची चौकशी; रात्रीच घाईघाईत केले ३ बहिणींचे अंत्यसंस्कार
तिन्ही बहिणींच्या खोलीतून सापडलेल्या नऊ पानांच्या एका छोट्या डायरीने त्यांच्या मानसिक स्थितीची आणि त्यांच्या जगाची झलक दाखवून दिली आहे. यामध्ये कोरियन संस्कृतीबद्दलचे त्यांचं प्रेम आणि कुटुंबातील तणावपूर्ण परिस्थितीचा उल्लेख आहे. पोलिसांनी मंगळवारी दिल्लीच्या शालीमार गार्डन भागातून तो मोबाईल जप्त केला. तपासात असंही समोर आलं आहे की, मुलींच्या आत्महत्येच्या बरोबर दोन आठवड्यांपूर्वी वडिलांनी हा फोन १५,००० रुपयांना विकला होता.
"आम्हाला कोरियाला घेऊन चला, तिथल्या शाळेत..."; ३ मुली गमावलेल्या वडिलांचा खळबळजनक दावा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहिणींच्या डायरीत कोरियाबद्दलची त्यांची ओढ आणि कुटुंबाने ती आवड सोडण्यासाठी त्यांच्यावर टाकलेला दबाव यांचा वारंवार उल्लेख आढळतो. डायरीत "आम्हाला कोरियन आवडतं. प्रेम, प्रेम, प्रेम" असे लिहिले असून, याला त्यांनी आपली "खरी जीवनकथा" म्हटलं आहे. जे काही लिहिलं आहे ते सत्य आहे आणि त्यावर विश्वास ठेवावा असंही त्यांनी नमूद केलं आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.