उल्हासनगरात किडनी ट्रान्सफर करण्याचे आमिष दाखवून ३१ लाखांची फसवणूक; डॉक्टरसह ७ जणांवर गुन्हा

By सदानंद नाईक | Updated: May 5, 2026 15:17 IST2026-05-05T15:15:00+5:302026-05-05T15:17:03+5:30

किडनी रॅकेट असल्याचा संशय

Fraud of Rs 31 lakhs in Ulhasnagar on the pretext of kidney transplant; 7 people including a doctor charged | उल्हासनगरात किडनी ट्रान्सफर करण्याचे आमिष दाखवून ३१ लाखांची फसवणूक; डॉक्टरसह ७ जणांवर गुन्हा

उल्हासनगरात किडनी ट्रान्सफर करण्याचे आमिष दाखवून ३१ लाखांची फसवणूक; डॉक्टरसह ७ जणांवर गुन्हा

सदानंद नाईक, उल्हासनगर: सात जणांच्या टोळक्याने किडनी ट्रान्सफर करण्याचे आमिष दाखवून एकाची ३१ लाख ६७ हजाराची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात डॉक्टरसह ७ जणांवर गुन्हा दाखल झाला असून गुन्ह्याचे सूत्र ओडिसा राज्यापर्यंत जात आहे.

उल्हासनगर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत चिंचपाडा येथे राहणाऱ्या दिपाली आनंद चव्हाण यांच्या पतीची एक किडनी खराब झाली आहे. त्यांच्या पतीची किडनी ट्रान्सफर करून देण्यासाठी डोनर मिळवून देतो, तसेच त्यांचे किडनी प्रत्यारोपणाचे ऑपरेशन करून देतो. असे आमिष मोसमी जयदेव बिस्वास, जयदेव बिस्वास, सुमानता पांडे, इकबाल अहमद मोहमद सिद्दीकी जहागीर खान, अभिषेक मन्ना, मोहमद शोएब मोहमद अब्बास अन्सारी व डॉ गौरव धर्मा नायर यांनी दाखविले. दिपाली चव्हाण यांच्याकडून पतीच्या उपचारासाठी तसेच किडनी डोनरला पैसे देण्यासाठी वेळोवेळी पैशाची मागणी केली. त्यांनी २ जुलै २०२५ ते ७ मार्च २०२६ दरम्यान ऐकून ३१ लाख ६७ हजार ८६० रूपये रक्कम ही रोख व ऑनलाईन स्वरूपात घेतली. हा गुन्हा समर्थ दवाखाना चिंचपाडा व ओडिसा राज्यातील एका दवाखान्यात घडला आहे.

डॉ. गौरव धर्मा नायर यांच्यासह ७ जणाने लाखो रुपये घेऊनही, पतीचे कोणत्याही प्रकारचे किडनी टान्सफरचे ऑपरेशन करून दिले नाही. तसेच घेतलेले पैसे करीत नसल्याने, आपली फसवणूक झाली. हे दिपाली चव्हाण यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठून झालेला सर्व प्रकार पोलिसांना कथन केला. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी डॉक्टरसह सात जणावर गुन्हा दाखल केला. आतापर्यंत एकालाही अटक केली नसलीतरी तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोळी यांनी दिली. दिपाली चव्हाण प्रमाणे इतरांना फसाविले गेले का? या दुष्टीने पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

किडनी रॅकेटचा संशय

पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी या गुन्हाकडे स्वतः लक्ष दिले असून दिपाली चव्हाण प्रमाणे इतर लोकांना असेच फसाविले का? या दुष्टीने पोलीस तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे.

 

Web Title : उल्हासनगर: किडनी ट्रांसप्लांट घोटाले में 31 लाख की ठगी, डॉक्टर समेत सात पर मामला.

Web Summary : उल्हासनगर में एक गिरोह ने किडनी ट्रांसप्लांट का वादा करके एक महिला को 31 लाख रुपये का चूना लगाया। पुलिस ने डॉक्टर सहित सात लोगों के खिलाफ मामला दर्ज किया है और एक संभावित किडनी रैकेट और ओडिशा से इसके संबंध की जांच जारी है।

Web Title : Ulhasnagar: Kidney transplant scam dupes victim of ₹31 lakhs; doctor booked.

Web Summary : A gang in Ulhasnagar lured a woman with a kidney transplant promise, defrauding her of ₹31 lakhs. Police have registered a case against seven individuals, including a doctor, with investigations ongoing into a possible kidney racket and its connection to Odisha.