शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

नागपुरात ऑनलाईन बाईक विक्रीच्या नावावर फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 7:31 PM

ओएलएक्स अ‍ॅपवर ऑनलाईन बाईकची विक्री करायची आहे, अशी बतावणी करून युवकाची ३६ हजार रुपयांनी फसवणूक केल्याची घटना घडली आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ओएलएक्स अ‍ॅपवर ऑनलाईन बाईकची विक्री करायची आहे, अशी बतावणी करून युवकाची ३६ हजार रुपयांनी फसवणूक केल्याची घटना घडली आहे. यात युवकाचे पैसेही गेले आणि बाईकही मिळाली नसल्यामुळे युवकाने सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.आनंद धनराज मलवे (२१) रा. स्मृतिनगर, कोराडी असे फिर्यादी युवकाचे नाव आहे. आनंदने १७ ऑगस्टला दुपारी १२.३० वाजता ओएलएक्स अ‍ॅपवर एक बाईक पसंत केली. अ‍ॅपवर दिलेल्या बाईकच्या मालकाचा मोबाईल क्रमांक ९३५२१०९२२६ वर त्याने संपर्क साधला. आरोपी बाईक मालकाने आनंदला १८ ऑगस्टला सकाळी ११.३० वाजता विमानतळावर बोलावले. तेथे गेल्यावर आनंदने आरोपीला मोबाईलवर संपर्क साधला. त्यावर आरोपीने मी विमानतळावर डिलिव्हरी करीत असून बाईक घेण्यासाठी आपल्या खात्यात ५ हजार रुपये टाकून एटीएमचा फोटो व्हॉट्सअप करण्यास सांगितले. त्यावर आनंदने आरोपीच्या व्हॉट्सअप क्रमांकावर एटीएमचा फोटो पाठविला. काही वेळानंतर आनंदच्या वडिलांच्या मोबाईलवर ओटीपी क्रमांक आला. दरम्यान आरोपीने आनंदला त्याच्या वडिलांच्या मोबाईलवर आलेल्या ओटीपीचा क्रमांक मागितला. ओटीपी क्रमांक देताच आनंदच्या खात्यातून ४७ हजार रुपयांची रक्कम कमी झाली. खात्यातून पैसे जाताच आनंदला आरोपीवर संशय आलाल. त्याने सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली. सायबर सेलमध्ये तक्रार करताच आनंदच्या खात्यात ११ हजार १६५ रुपये परत आले. यात आनंदला बाईकही मिळाली नाही आणि आरोपीने त्याचे ३५ हजार ८३५ रुपये घेतले. त्याने दिलेल्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध फसवणूक आणि आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी