शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

विमानाची तिकीटे घेऊन दीड कोटींची फसवणूक करणाऱ्या इंग्लडमधील कंपनीविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 2:31 PM

कोरेगाव पार्क येथील गेरा गार्डनमध्ये ओडिसी टुर्स अँड ट्रॅव्हल्स या कंपनीचे कार्यालय असून कंपनी विमान तिकीट विक्रीचा व्यवसाय केला जातो़.

ठळक मुद्देकोरेगाव पार्क पोलिसांनी जॉन स्टील व इतरांवर गुन्हा दाखलओडिसी टुर्सकडून ९८ आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाची तिकीटांची खरेदी

पुणे : पुण्यातील एजन्सीकडून विमानाची तिकीटे घेऊन त्याचे पैसे न देता १ कोटी ४३ लाख ५३ हजार फसवणूक केल्याप्रकरणी इग्लंडच्या ए़.शुलमन आय़ एऩ सी लिमिटेड या कंपनीच्या प्रमुखासह भारतातील कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.याप्रकरणी निखिल ठाकुरदास (वय ४२, रा़ कल्याणीनगर) यांनी फिर्याद दिली आहे़ याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क येथील गेरा गार्डनमध्ये ओडिसी टुर्स अँड ट्रॅव्हल्स या कंपनीचे कार्यालय असून कंपनी विमान तिकीट विक्रीचा व्यवसाय केला जातो़. निखिल ठाकुरदास हे या कंपनीत मुख्य व्यवस्थापक म्हणून काम करतात़. त्यांची एजन्सी भारतातील व परदेशातील वैयक्तिक प्रवास व कॉर्पोरेट कंपन्या यांच्यासाठी विमान तिकीटे, हॉटेल व टुरिझम ही सेवा पुरविते़. ए़. शुलमन प्लास्टिक इंडिया या बडोदा येथील कंपनी ओडिसा टुर्सचे ८ वर्षांपासून ग्राहक आहेत़. त्यांची मुख्य कंपनी यु़ के़शुलमन आय एन सी लि़ या नावाने इंग्लडमध्ये आहे़. या कंपनीचे उत्पादन व्यवस्थापक जॉन स्टील हे असून भारतातील कंपनीचे मनुष्यबळ विकास अधिकारी रणदीप रणदेव, व्यवस्थापक निराली मोरे, महाव्यवस्थापक सुबेंद्रु रॉय हे आहेत़  या कंपनीचे उत्पादन व्यवस्थापक जॉन स्टील व इतर लोकांनी २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०१५ या दरम्यान ओडिसी टुर्सकडून ९८ आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाची तिकीटांची खरेदी करुन त्या तिकीटांचे पैसे न देता या तिकीटांचा वापर केला़. ठाकुरदास यांनी कंपनीकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली़. २०१५ मध्ये कोरेगाव पार्क पोलिसांकडे फसवणूक झाल्याचा अर्जही दिला होता़. दरम्यान, पैसे देण्याबाबत त्यांच्यात सातत्याने ई मेल व प्रत्यक्ष बोलणी सुरु होती़ त्यामुळे जर गुन्हा दाखल केला तर पैसे मिळायला अडचण होईल, म्हणून त्यांनी गुन्हा दाखल केला नव्हता़. आता ती कंपनी ठाकुरदास यांना फक्त ५ हजार डॉलर घ्या व हे प्रकरण मिटवा असे म्हणू लागली़. त्यामुळे ओडिसी टुर्सला मोठे नुकसान होणार असल्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करुन फसवणूक करण्याच्या इराद्याने ही तिकीट खरेदी करुन फसवणूक केल्याबद्दल फिर्याद दिली. कोरेगाव पार्क पोलिसांनी जॉन स्टील व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे़. 

टॅग्स :PuneपुणेEnglandइंग्लंडfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीairplaneविमान