पूर्ववैमनस्यातून चौघा जणांचा तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; थेऊर येथील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 07:07 PM2021-01-27T19:07:18+5:302021-01-27T19:09:59+5:30

जवळच्या नात्यातील मुलीच्या प्रेमप्रकरणातून बंटी रणदिवे याला आकाश याने समज दिली होती...

Four people attack on youth by weopan from former issue; Incident at Theur | पूर्ववैमनस्यातून चौघा जणांचा तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; थेऊर येथील घटना 

पूर्ववैमनस्यातून चौघा जणांचा तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; थेऊर येथील घटना 

googlenewsNext

लोणी काळभोर : थेऊर ( ता हवेली ) येथे पुर्वी झालेल्या किरकोळ वादाच्या कारणावरुन चार जणांनी एकावर कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये तरूण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी आकाश मधुकर भंडारी ( वय २१, रा. थेऊर, ता. हवेली ) याने दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय धनंजय सोनवणे, बाबु ( पुर्ण नाव माहीत नाही ) डोळ्याने चकणा व मंदार सकट याचा भाऊ ( नाव माहीत नाही ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळच्या नात्यातील मुलीच्या प्रेमप्रकरणातून बंटी रणदिवे याला आकाश याने समज दिली होती तेव्हा पासुन बंटी व त्याचे मित्र सोनवणे व इतरांशी किरकोळ वाद होत होते. तसेच आकाशचा मित्र अरविंद कांबळे याचे अक्षय सोनवणे व त्याच्या मित्रांसोबत वाद असल्याने अक्षय सोनवणे,बाबु सकट यांनी आकाशला अरविंद कांबळे सोबत राहू नकोस नाहीतर तुला पश्चाताप होईल अशी धमकी दिली होती.

मंगळवारी ( दि.२६ ) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आकाश शुभम मोबईल शॉपीवर असताना तेथे वरील चारजण आले. अक्षय सोनवणे व बाबु दुकानात येऊन त्यातील सोनवणे हा आकाशला तू मला का शिव्या दिल्या, बाहेर ये असे म्हणाला. आकाश दुकानाच्या बाहेर पायऱ्यांवर आल्यावर सोनवणे व त्याच्यासोबत आलेल्यांनी कोयत्याने वार केला. आरोपींच्या तावडीतून सुटून पळुन तो विठ्ठल - रुक्मिणी मंदिराकडे गेला. तेथे त्याचा भाऊ कोकाटे हा भेेटला. त्याने त्याला प्रथम सय्यद हॉस्पीटल व नंतर लोणी स्टेशन येथील विश्वराज हॉस्पीटल येथे उपचारासाठी दाखल केले.

Web Title: Four people attack on youth by weopan from former issue; Incident at Theur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.