शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

महिलेची धिंड काढणारे पाच जण ताब्यात, वरिष्ठांकडे तक्रार केल्याने पोलिसांकडून शिवीगाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 06:22 IST

शनिवारी पोलिसांनी जामूनकरसह अन्य चौघांना ताब्यात घेतले. मूळ गुन्ह्यात ‘नरबळी व इतर अमानुष, अघोरी व दुष्कर्मी प्रथा व जादूटोणा’ अधिनियमाचे कलम ३ समाविष्ट करण्यात आले. 

- नरेंद्र जावरेचिखलदरा (जि. अमरावती) : रेट्याखेडा येथे जादूटोण्याच्या संशयावरून ७७ वर्षीय काळमी शेलूकर यांची धिंड काढून अघोरी छळ करण्यात आल्याची घटना शुक्रवारी समोर आली. यात मारहाणीचा गुन्हा दाखल असलेला आरोपी बाबू जामूनकर हा तेथील पोलिस पाटील व माजी सरपंच असल्याचे उघड झाले. शनिवारी पोलिसांनी जामूनकरसह अन्य चौघांना ताब्यात घेतले. मूळ गुन्ह्यात ‘नरबळी व इतर अमानुष, अघोरी व दुष्कर्मी प्रथा व जादूटोणा’ अधिनियमाचे कलम ३ समाविष्ट करण्यात आले. 

कुटुंबीयांचा आरोपपीडितेला मूत्र पाजले, चटके देण्यात आले. सुनेने ६ जानेवारीला रात्री तक्रार नोंदविली. धिंड काढल्याची माहिती देऊनही ती एफआयआरमध्ये समाविष्ट केली नाही, असा कुटुंबाचा आरोप आहे. 

राज्यभर खळबळ‘लोकमत’ने १८ जानेवारीला महिलेवरील अघोरी छळाचे वृत्त प्रकाशित करताच राज्यभर खळबळ उडाली. पोलिस अधीक्षक आनंद यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन कारवाईची हमी दिली.

‘ती’ १८ दिवसांनंतर गावीगावात काळमी शेलूकर यांना ३० डिसेंबरला धिंड काढून मारहाण झाली. डोक्यावर गाठोडे बांधून त्यांना गावाबाहेर हाकलण्यात आले. तेव्हापासून १८ दिवसांनंतर शनिवारी त्या सून व मुलासोबत गावी आल्या.

मुलास पोलिसाचा फोन जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना तक्रार केली म्हणून एका पोलिसाने शेलूकर यांच्या मुलास शनिवारी सकाळी फोन करून प्रचंड शिवीगाळ केली.

आरोपी पोलिस पाटील असल्याने त्याला पदमुक्त करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी बोलू. पाच आरोपींना ताब्यात घेतले. मूळ गुन्ह्यात कलम वाढ करण्यात आली आहे.- विशाल आनंद, पोलिस अधीक्षक

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती