शहरं
Join us  
Trending Stories
1
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
2
"राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
3
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
4
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
5
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
6
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
7
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
8
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
9
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
11
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
12
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
13
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
14
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
15
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
16
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
17
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
18
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
19
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
20
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 

नात्याला काळीमा! पोटच्या पोरीवर बापाची वाईट नजर; मुलीनं विरोध केल्यावर तिचे केस कापले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 9:56 AM

हे प्रकरण मेरठच्या लिसाडी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. याठिकाणी २० वर्षाच्या मुलीने बापावर आरोप केलाय

ठळक मुद्देघडलेला प्रकार पीडिताने ११२ नंबरवर फोन करून पोलिसांना सांगितला. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी बापाला अटक केलीरागाच्या भरात त्याने कैची घेऊन मुलीचे केस कापले आणि वस्तऱ्याने तिला टकलं केले.मागील ३ वर्षापासून तिचा बाप तिच्यासोबत अशाप्रकारे घाणेरडे कृत्य करत आहे. घराची इज्जत राखण्यासाठी मुलीने आजपर्यंत हे बाहेर सांगितलं नाही

मेरठ – उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी एक बाप स्वत:च्या मुलीकडे वाईट नजरेने पाहत होता आणि वारंवार तिचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न करत होता. ज्यावेळी मुलीने याचा विरोध करण्यास सुरूवात केली तेव्हा बाप मुलीला बेदम मारहाण करत आणि घाणेरड्या शब्दात शिवीगाळ करायचा. त्यानंतर या बापाने कहरच केला. आरोपी बापाने मुलीचे केस कापून तिला टकलं केलं.

हे प्रकरण मेरठच्या लिसाडी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. याठिकाणी २० वर्षाच्या मुलीने बापावर आरोप केलाय की, आरोपी वडील दारूच्या नशेत तिच्यासोबत अश्लील बोलत होता. तसेच वाईट नजरेचे तो पाहायचा. अनेकदा बापाने तिच्यासोबत चुकीचं कृत्य करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्यांना यात यश आलं नाही तेव्हा रागाच्या भरात त्याने कैची घेऊन मुलीचे केस कापले आणि वस्तऱ्याने तिला टकलं केले.

घडलेला प्रकार पीडिताने ११२ नंबरवर फोन करून पोलिसांना सांगितला. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी बापाला अटक केली. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. पीडिताने तक्रारीत म्हटलंय की, जेव्हा तिची आई नमाज पठण करण्यासाठी बसत होती तेव्हा बाप दारूच्या नशेत तिच्यासोबत आक्षेपार्ह कृत्य करत होता. या प्रकारावरून अनेकदा घरात भांडणं झाली. परंतु नातेवाईकांच्या मध्यस्थीनंतर सुरुवातीला याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली नाही.

पीडित मुलीचा आरोप आहे की, मागील ३ वर्षापासून तिचा बाप तिच्यासोबत अशाप्रकारे घाणेरडे कृत्य करत आहे. घराची इज्जत राखण्यासाठी मुलीने आजपर्यंत हे बाहेर सांगितलं नाही. परंतु यावेळी जेव्हा आई नमाज पठण करत होती तेव्हा आरोपी बाप मुलीच्या खोलीत घुसला आणि तिच्यासोबत लैंगिक चाळे करू लागला. जेव्हा मुलीने त्याचा विरोध करत ओरडण्यास सुरूवात केली तेव्हा बापाने कैचीने तिचे केस कापले आणि वस्तऱ्याने तिला टकलं केले.

या प्रकरणी आरोपी बापाला अटक करण्यात आली आहे. मुलीच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे. जे काही सत्य असेल त्याच्या आधारे पोलीस कारवाई करेल असं आश्वासन पोलीस अधिकारी अरविंद चौरसिया यांनी दिलं आहे.

टॅग्स :PoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश