बापाने मुलाला नपुंसक करण्याच्या गोळ्या दिल्या; त्यानंतर सुनेसोबत केलं अश्लील कृत्य, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 02:17 PM2021-05-10T14:17:59+5:302021-05-10T14:29:54+5:30

आरोपी सासऱ्याने आपल्या सुनेला ताब्यात घेण्यासाठी वाटेल ते प्रयोग चालू केले.

A father-in-law has raped his daughter-in-law in Uttar Pradesh | बापाने मुलाला नपुंसक करण्याच्या गोळ्या दिल्या; त्यानंतर सुनेसोबत केलं अश्लील कृत्य, अन्...

बापाने मुलाला नपुंसक करण्याच्या गोळ्या दिल्या; त्यानंतर सुनेसोबत केलं अश्लील कृत्य, अन्...

Next

उत्तरप्रदेशमधील बरेली गावातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सासऱ्याने स्वतःच्याच मुलाला नपुंसक बनवून सुनेसोबत अश्लील कृत्य केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. बरेली गावातील एक २८ वर्षीय महिला तेथील पोलीस स्टेशनमध्ये गु-न्हा दाखल करण्यास गेली तेव्हा तेथील पोलिसांना जेव्हा सर्व हकीकत सांगितली तेव्हा पोलिसही ऐकून हैराण झाले. महिलेनं आपल्या सोबत घडलेली घटना सांगितल्यानंतर सर्वांच्या अंगावर काटाच आला.

आरोपी सासऱ्याने आपल्या सुनेला ताब्यात घेण्यासाठी वाटेल ते प्रयोग चालू केले. आपल्याच सुनेवर वाईट नजर ठेवून असणाऱ्या सासऱ्याचे कृत्य जर नवऱ्याला सांगितले तर नवरा विश्वास ठेवणार नाही या भीतीने तिने नवऱ्यालाही काही सांगितले नाही. मात्र सासऱ्यानेनंतर असे काही कृत्य केले की त्यानंतर बाप आणि मुलाच्या नात्याला कालीमा फासणारी घटना घडली. 

सासऱ्याने स्वतःच्याच मुलाला नपुंसक करण्यासाठी गोळ्या देण्यास सुरुवात केली. त्यानंतर मुलाच्या बापाने त्याच्याच सुनेसोबत शारीरिक संबंध ठेवणायास सुरूवात केली. काही दिवसानंतर जेव्हा पीडित सुनेला या वेदना आणि हा त्रास सहन झाला नाही. त्यामुळे पीडित महिलेने पोलीस स्थानकात जाऊन सासऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. 

आरोपी सासऱ्यावर पोलीस स्थानकात गुन्हा तर नोंद झाला. मात्र अजूनही पीडित महिलेला न्याय मिळाला नाही. कारण पीडित महिला गुन्हा दाखल करणार असल्याचे समजताच सासऱ्याने सुनेला घरातून हाकलून लावले आणि सुनेचे चारित्र ठिक नसल्याचे सांगत स्व:ताचा बचाव करण्याचा प्रयत्न आरोपीने केला. संबंधित पोलीस या घटनेबाबत चौकशी करत असून लवकरात लवकर नेमकं प्रकरण काय आहे, याची तपासणी करुन दोषींवर कारवाई करणार असल्याची माहिती दिली. 
 

Web Title: A father-in-law has raped his daughter-in-law in Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.