शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकर महिलेशी बोलणे पडले महाग; धुळ्याच्या युवकाचे नाशकात आणून केले मुंडण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 22:05 IST

Crime News : पाच संशयितांना अटक; बेदम मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

ठळक मुद्दे पुण्यातील काही संशयितांच्या टोळक्याने धुळे गाठून त्या युवकाला मारहाण करत बळजबरीने मोटारीत टाकून नाशिकच्या पंचवटीत आणून मुंडण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

नाशिक : पुणेकर असलेल्या एका महिला पदाधिकाऱ्यासोबत मोबाइलवर सातत्याने मेसेज करत त्यांच्याशी जवळीक निर्माण करण्यासाठी सतत संवाद साधण्याचा प्रयत्न धुळ्याच्या एका युवकाला चांगलाच भोवला. पुण्यातील काही संशयितांच्या टोळक्याने धुळे गाठून त्या युवकाला मारहाण करत बळजबरीने मोटारीत टाकून नाशिकच्या पंचवटीत आणून मुंडण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पुणेकर महिलेसोबत मोबाइलवरुन बोलणे आणि चॅटिंग करणाऱ्या १८वर्षीय फिर्यादी विलास चव्हाण या तरुणाला पुण्यातील संशयित आरोपी सोनाली निंबाळकर(३४,रा. स्ट्रीट कॅम्प,पुणे), जयसिंगकौर तेजिंदरसिंग छाबडा(३४), निलेश सुरेश जाधव(३९,रा.लक्ष्मीनगर, पुणे), राहुल निंबाळकर(३३,रा. हॅपी कॉलनी, पुणे), सागर शिवाजी गायकवाड(३१) यांनी धुळे गाठून त्यास घरातून बाहेर बोलावून मोटारीत (एम.एच.१४ बीएक्स ८३२६) डांबले आणि बेदम मारहाण केली. हात पाय बांधून मोटार थेट नाशिकच्या दिशेने दामटविली. येथील पंचवटी भागातील फुलेनगर या भागात बुधवारी सकाळी एका सलूनच्या दुकानात चव्हाण यास बळजबरीने घेऊन जात तेथे त्याचे मुंडण केल्याचे त्याने पंचवटी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पंचवटी पोलिसांनी या सर्व संशयितांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करुन बुधवारी (दि.३०) ताब्यात घेतले. 

पंचवटीकरांचे प्रसंगावधान; पोलिसांची तत्परताफुलेनगर भागातील रहिवाशांच्या जेव्हा काही तरी वेगळाच प्रकार घडत असल्याचे लक्षात आले तेव्हा या भागातील नागरिकांनी त्वरित पंचवटी पोलीस ठाण्याला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक भगत, अशोक साखरे, सहायक निरिक्षक सत्यवान पवार यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ लवाजमा घेऊन फुलेनगर गाठले. यावेळी संशयितांच्या मोटारीला पोलिसांनी त्यांच्या वाहनांनी सर्वप्रथम ब्लॉक केले. सर्व संशयित आरोपींना ताब्यात घेत अटक करत गुन्ह्यात वापरलेली चारचाकी जप्त केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांमध्ये दोघा महिलांचा समावेश असून ते एका राजकिय-सामाजिक संघटनेचे पदाधिकारी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDhuleधुळेNashikनाशिकPuneपुणेWomenमहिला