शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

अरे बापरे! हद्दीच्या वादात झिजविले चार पोलीस ठाण्याचे उंबरठे, २ दिवसांनी सापडला मृतदेह 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 5:27 PM

गरीब कुटुंबाची रात्रभर फिरफिर

ठळक मुद्देया कुटुंबाने रात्रभर पोलिसांचे उंबरठे झिजविले, मात्र, कोणालाच पाझर फुटला नाही.  या कुटुंबाने त्यांची ही अट मान्य केली व तरुणांनी शोध कार्य सुरु केले.

जळगाव :  मेहरुण तलावात आमचा भाऊ बुडाला आहे, तुम्ही काही तरी मदत करा, अशी याचना करणाऱ्या  साईनाथ गोपाळ या तरुणाच्या कुटुंबाला मदत तर सोडाच, उलट हद्दीचा वाद निर्माण करुन चार पोलीस ठाणे फिरविले. या कुटुंबाने रात्रभर पोलिसांचे उंबरठे झिजविले, मात्र, कोणालाच पाझर फुटला नाही. तलावात बुडालेला साईनाथ सापडत नसल्याने त्याच्या कुटुंबियांनी सर्व प्रथम एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून माहिती दिली असता तो समता नगरातील रहिवाशी असल्याने रामानंद नगर पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे कुटुंब रामानंद नगर पोलीस स्टेशनला गेले. तेथेही तोच कित्ता गिरविण्यात आला. मुलगा पिंप्राळा रेल्वे गेटजवळून गेल्याचे सांगून त्यांना शहर पोलीस स्टेशनला पाठविण्यात आले. तेथूनही जिल्हा पेठची पाठविण्यात आले. जिल्हा पेठला गेल्यावर मेहरुण तलाव एमआयडीसी हद्दीत असल्याने तिकडे पाठविण्याचा सल्ला दिला. त्यामुळे हे कुटुंब शहरातील सर्व पोलीस स्टेशन फिरुन परत रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गेले. तेव्हा दोन पोलीस कर्मचाºयांना पाठविण्यात आले.पोलीस म्हटले, पाण्यात तरंगून आला तर ठिक नाही तर घरी जा !रात्री साईनाथचा शोध लागला नाही. त्यामुळे कुटुंब चिंतेत होते. गुरुवारी सकाळी त्यांनी पुन्हा एमआयडीसी पोलीस स्टेशनशी संपर्क केला असता दोन पोलीस कर्मचारी आले. त्यांनी काही तरुणांच्या माध्यमातून शोध घेतला, मात्र तेव्हाही काही थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे दुपारी १२ वाजेपर्यंत साईनाथ पाण्यातून तरंगत वर येईल व नाही आला तर तुम्ही घरी निघून जा असा सल्ला या पोलिसांनी दिला. तरुणाचा शोध लागावा यासाठी महापालिका किंवा तहसीलदार यांना कळविण्याची तसदी घेतली नाही.गरीबीची अशीही थट्टाया घटनेत पोलीस, महापालिका व महसूल प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून आले. गोपाळ कुटुंब गरीब होते, त्यांच्या मागे कोणीच नाही म्हणूनच कि काय त्यांच्यावर अशी वेळ आली. मुलाचा शोध घेण्यासाठी हे कुटुंब अक्षरश: पोहणाऱ्या तरुणांच्या विनवण्या करीत होते. काही जण मदतीला आले, मात्र त्यासाठी सहाशे रुपये लागतील, मग साईनाथ सापडला तरी आणि नाही सापडला तरी पैसे द्यावेच लागतील अशी अट ठेवली. या कुटुंबाने त्यांची ही अट मान्य केली व तरुणांनी शोध कार्य सुरु केले.मोबाईल व कपडे सापडलेतलावाच्या काठी साईनाथ याचे शर्ट आढळून आले. त्याचा भाऊ सुकलाल व बहिण उषा रात्रीपासून तलावाच्याच काठी आक्रोश करीत होते. गुरे चारणाऱ्या मुलांना एक मोबाईल सापडला तो साईनाथचा निघाला. या मुलांनी प्रामाणिकपणे मोबाईल परत करुन त्यांना धीर दिला. सकाळी समता नगरातील नागरीक मोठ्या संख्येने जमले होते. मुलगा सापडत नसल्याने कुटुंबाचा आक्रोश सुरु होता.पत्नी प्रसुतीसाठी माहेरीसाईनाथ हा विवाहित असून पहिलीच प्रसुती असल्याने पत्नी आशाबाई महिनाभरापासून माहेरी मुंबई येथे गेलेली आहे.आई शांताबाई, वडील शिवाजी रामा गोपाळ, भाऊ सुकलाल, बहिण उषा आदी जण मजुरीचे काम करतात.

 

मामाच्या मुलांसोबत माझा भाऊ तलावावर फिरायला आलेला होता. पाय धुताना तो तलावात बुडाला. पोलीस वेगवेगळे पोलीस स्टेशनला जाण्याचा सल्ला देत आहेत. पाण्यातून तरंगत वर नाही आला तर घरी निघून जा असे पोलिसांनी सांगितले. पोहणाºया तरुणांना पैसे देऊन भावाचा शोध घेत आहोत. - सुकलाल गोपाळ, भाऊ 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी 

 

Sushant Singh Rajput Suicide : संजय राऊत, मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात तक्रार, पाटणा पोलिसांकडे अटकेची मागणी 

 

सुशांतच्या कुटुंबीयांना शांत बसावं आणि मुंबई पोलिसांना सहकार्य करावं: संजय राऊत

 

डॉ.पायलच्या आत्महत्येतील संशयितांना इतर महाविद्यालयात प्रवेश नको

 

सुरज पांचोलीने सुशांत प्रकरणाची CBI चौकशीची मागणी केली अन् म्हणाला मैं दुआ करता हूं कि उनके परिवार को...

टॅग्स :PoliceपोलिसDeathमृत्यूJalgaonजळगावdrowningपाण्यात बुडणे