शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

कळंगुट परिसरात नायजेरियन नागरिकाकडून पावणेदोन लाखांचे अंमली पदार्थ जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 13:35 IST

गोव्यातील पर्यटन हंगामाची सुरुवात झाली असतानाच कळंगुट पोलिसांनी अमली पदार्था विरोधाची मोहीम सुरूच ठेवली आहे.

म्हापसा : गोव्यातील पर्यटन हंगामाची सुरुवात झाली असतानाच कळंगुट पोलिसांनी अमली पदार्था विरोधाची मोहीम सुरूच ठेवली आहे. पोलिसांनी नायजेरियन नागरिकाकडून पावणेदोन लाख रुपये किंमतीचा अमली पदार्थ ताब्यात घेतला आहे. सदर संशयिता विरोधात करण्यात आलेली ही दुसरी कारवाई आहे. कळंगुट पोलिसांनी केलेली या वर्षातील ही ३७ वी कारवाई आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची कारवाई गुरुवारी रात्री कांदोळी येथील ओ हॉटेल नजिक करण्यात आली. या प्रकरणात नायजेरियन नागरिक थोगो चिगोझी (३३) याला ताब्यात घेण्यात आले. तसेच त्याने वापरलेली दुचाकी सुद्धा ताब्यात घेतली आहे. संशयित अमली पदार्थ घेवून येणार असल्याचा सुगावा लागताच त्याला ताब्यात घेण्यासाठी सापळा रचण्यात आलेला.त्याच्याकडून ११९६ किलो ग्रॅम चरस, ४  ग्रॅम कोकेन, १७ ग्रॅम चरस मिळून १ लाख ७५ हजार रुपये किंमतीचा अमली पदार्थ ताब्यात घेण्यात आला आहे. थोगो चिगोझीच्या विरोधात करण्यात आलेली ही दुसरी कारवाई आहे. २०१५ साली त्याला कळंगुट पोलिसांनी दुसºया एका अशाच प्रकारच्या गुन्ह्याखाली अटक केली होती. त्यानंतर २०१८ साली त्याची सुटका करण्यात आलेली.संशयिता विरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याच्या विविध कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रिमांडासाठी त्याला न्यायालया समोर हजर करण्यात येणार आहे. सदरची कारवाई निरीक्षक नोलास्को रापोझ यांच्या नेतृत्वाखाली महिला उपनिरीक्षक दीपा देयकर, कॉन्स्टेबल विनय श्रीवास्तव, शशांक साखळकर, दिनेश मोरजकर, सुरेश नाईक यांनी केली. पुढील तपास अधीक्षक उत्कृर्ष प्रसून्न तसेच उपअधीक्षक  उत्तम राऊत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विराज नाईक करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoaगोवाDrugsअमली पदार्थ