A drug smuggler found in the quarantine center after the incident of rape | बलात्काराच्या घटनेनंतर क्वारंटाईन सेंटरमध्ये सफाई कामगार निघाला ड्रग्ज तस्कर  

बलात्काराच्या घटनेनंतर क्वारंटाईन सेंटरमध्ये सफाई कामगार निघाला ड्रग्ज तस्कर  

ठळक मुद्देअलगीकरण कक्षाबाहेर सापळा रचून अविनाश सिंह (२४) व श्रवण गुप्ता (३८) या दोघांना २ किलो चरस सह अटक केली होती.

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या अलगीकरण कक्षात सुरक्षा रक्षकाने बलात्कार केल्याची घटना घडी असतानाच आता मुंबई पोलिसांनी पकडलेला अमली पदार्थ विक्रेता हा पालिकेच्या याच अलगीकरण कक्षात सफाई कामगार म्हणून कामाला होता असे उघडकीस आले आहे.

मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने १५ सप्टेंबर रोजी भाईंदर पूर्वेला गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुलाजवळ पालिकेच्या अलगीकरण कक्षाबाहेर सापळा रचून अविनाश सिंह (२४) व श्रवण गुप्ता (३८) या दोघांना २ किलो चरस सह अटक केली होती. हे दोघेही आरोपी नालासोपाराचे राहणारे आहेत. या आरोपींनी भाईंदरच्या  बलराम उर्फ बल्ली यादव (३३) याच्या कडून चरस घेतल्याचे मुंबई पोलिसांना सांगितले होते .

मुंबई पोलिसांनी ठाणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येऊन हि कारवाई केल्याने खळबळ उडाली होती. त्या नंतर नवघर पोलीस देखील सक्रिय झाले व त्यांनी बल्ली यादव याला गुरुवारी रात्री अटक केली . यादव हा नेपाळ वरून उत्तर प्रदेश - बिहार मार्गे चरस आणत असे व अन्य मागणी धारकांना तो पुरवत असे असे. नवघर पोलिसांनी बल्ली यादवची चौकशी केली असता अटक आरोपी अविनाश सिंह हा अलगीकरण कक्षात सफाई कामगार म्हणून काम करत होता आणि १२ सप्टेंबर रोजीच त्याला चरसचा पुरवठा केला होता असे चौकशीत उघड झाले .

दरम्यान अविनाश सिंह हा पालिकेने साफसफाईचा ठेका दिलेल्या ठेकेदार सिटीझन अलाइट या ठेकेदाराचा ठेक्यावरील कर्मचारी असल्याचे उघड झाले आहे . तो जून पासून पालिकेच्या अलगीकरण कक्षात सफाई कामगार म्हणून काम करत होता . मुंबई पोलिसांनी १५ सप्टेंबर रोजी त्याला पकड्ले त्यावेळी देखील तो कामावर हजर होता . त्या नंतर मात्र तो कामावर आलेला नाही असे अलगीकरण कक्षातून सूत्रांनी सांगितले. बल्लीने चरसचा साठा दिला तो अविनाश याने अलगीकरण कक्षातच ठेवला होता असा संशय आहे . शिवाय या आधी त्याने चरसची तस्करी व विक्री केल्याची शक्यता आहे . त्या अनुषंगाने आता नवघर पोलीस निरीक्षक संपत पाटील यांच्या मार्गदर्शना खाली तपास सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले .

पालिकेच्या सदर अलगीकरण कक्षात सैनिक सिक्युरिटी या ठेकेदाराच्या सुरक्षा रक्षकाने अलगीकरण कक्षात ठेवलेल्या २० वर्षीय नवविवाहितेवर सलग तीन रात्र बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर विक्रम शेरे याला अटक करण्यात आली . त्यावरून पालिकेवर टीकेची झोड उठली असतानाच आता सिटीझन अलाइट या ठेकेदाराच्या सफाई कर्मचाऱ्यास पोलिसांनी चरस प्रकरणी अटक केल्याने पालिका आणि सत्ताधारी भाजपावर टीकेची झोड वाढली आहे. वास्तविक सदरचे ठेके अनावश्यक किंवा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी घेऊन पालिकेची लूट चालवली जात आहे . तसेच मर्जीतील ठेकेदारास देतानाच या मागे राजकीय लागेबांधे देखील गुंतले असल्याने ठेकेदारांना पाठीशी घातले जात असल्याचे आरोप होत आहेत.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

चीनसाठी हेरगिरी करणाऱ्या पत्रकारासह महिला आणि पुरुषास अटक

 

बलात्कारास विरोध केल्याने काकाने चिमुकलीचे केली हत्या, कुजलेल्या मृतदेहावर आढळल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या खुणा

 

युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच 

 

Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा 

 

करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार 

 

गँगरेप! महिलेच्या अब्रूचे लचके तोडून बनवला व्हिडीओ अन् केला व्हायरल 

 

 

Web Title: A drug smuggler found in the quarantine center after the incident of rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.