शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली : सामूहिक बलात्कार प्रकरणात आणखी दोघांना केली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 11:08 IST

सर्व आरोपी गजाआड : उद्या न्यायालयात पुन्हा हजर करणार

ठळक मुद्देसर्व आरोपी गजाआड : उद्या न्यायालयात पुन्हा हजर करणार

डोंबिवली : १५ वर्षीय पीडित मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात ३३ जणांवर गुन्हे दाखल आहेत. रविवारपर्यंत ३१ नराधमांना पोलिसांनीअटक केली होती. त्यातील दोन आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी भिवंडी बालसुधारगृहात करण्यात आली, तर आणखी दोन फरार आरोपींचा शोध सुरू होता. या दोन्ही आरोपींना सोमवारी अटक केल्याने या गुन्ह्यातील सर्व आरोपींना जेरबंद केले आहे. 

तब्बल ३३ नराधमांनी आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. तक्रार दाखल होताच तत्काळ २३ आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. त्यातील दोघे अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली, तर उर्वरित १२ आरोपींचा शोध सुरू होता. शुक्रवारपर्यंत सहा जणांना जेरबंद केले, तर चार आरोपी फरार होते. चौघांनी मोबाइल स्वीच ऑफ होते.  त्यामुळे आरोपींचे नातेवाईक आणि मित्रांवर पोलिसांनी वॉच ठेवला होता. त्यामुळे चारही आरोपींना अटक करण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिली.

सुनावणीकडे लागले लक्षनराधमांनी बलात्काराचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडित मुलीवर वारंवार बलात्कार केला आहे. दरम्यान, त्यातील काही व्हीडिओ क्लिप पोलिसांच्या हाती लागल्याची सूत्रांची माहिती असून, काही आरोपींनी काही क्लिप्स मोबाइलमधून डिलीट केल्याचीही माहिती मिळत आहे. त्यामुळे आरोपींचे मोबाइल फॉरेन्सिक लॅबकडे पाठविले आहेत. आरोपींना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालयात आरोपींना हजर केल्यावर सरकारी वकिलांकडून पोलीस कोठडी वाढवून दिली जावी, अशी मागणी केली जाण्याची शक्यता आहे. त्यातील १९ आरोपींचे वकीलपत्र महिला वकील तृप्ती पाटील यांनी घेतले आहे. ते काय युक्तिवाद करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पीडितेला नेले होते घटनास्थळी व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी देत प्रियकरासह, मित्रांनी डोंबिवलीसह बदलापूर, रबाळे, मुरबाड या परिसरात पीडितेवर सामूहिक बलात्कार केला आहे. दरम्यान, पोलिसांकडून पीडितेला ज्या ठिकाणी बलात्काराचा प्रकार घडला त्याठिकाणी नेण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक