शहरं
Join us  
Trending Stories
1
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
4
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
5
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
6
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
7
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
8
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
9
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
10
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
11
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
12
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
13
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
14
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
15
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
16
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
17
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
18
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
19
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
20
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर पतीनं आधी गळा दाबला अन् मग ५० किमी दूर जाऊन पत्नीसह कारला लावली आग; भयंकर हत्याकांड उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 21:38 IST

हा प्रकार सुरू असताना मुलीला जाग आली. तिने आरोपीला विचारले असता त्याने आईला डॉक्टरकडे नेतोय, दरवाजा लाव असं सांगितले. त्यानंतर आरोपी सागरच्या दिशेने निघाला.

सागर - मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात कारमध्ये जळून महिलेचा मृत्यू झाल्याचं समोर आले होते. मात्र या प्रकरणात भयंकर हत्याकांड उघड झाले आहे. जी घटना एखादा अपघात असल्याचं सांगितले जात होते, तो एक सुनियोजित हत्येचा कट असल्याचं तपासात उघड झाले. आरोपी डॉक्टर पतीने आधीच घरी पत्नीचा गळा दाबून खून केला होता. त्यानंतर पुरावे मिटवण्यासाठी त्याने ५० किलोमीटर दूर जाऊन कारवर पेट्रोल टाकून पत्नीसह तिला आग लावली. 

माहितीनुसार, या घटनेतील मृत महिलेचं नाव सीमा कुर्मी असं आहे तर आरोपी पती डॉक्टर निलेश कुर्मी असं आहे. पोलिसांनी निलेशला २ साथीदार रामकृष्ण आणि शुभम यांच्यासह अटक केली आहे. तपासात मुख्य आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. २० मार्चच्या रात्री २ वाजता निलेश घरी परतला होता. रात्री उशिरा घरी आल्याने पत्नी सीमाने त्याला प्रश्न विचारले. ज्यातून या दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात निलेशने सीमाचा गळा दाबला. त्यानंतर सीमा बेशुद्ध झाली, त्यामुळे आरोपी घाबरला आणि हे कृत्य लपवण्यासाठी त्याने षडयंत्र रचले. त्याने रामकृष्ण आणि शुभम या दोघांना बोलावून घेतले आणि सीमाला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगत तिला घेऊन हॉस्पिटलला जायचे असल्याची बतावणी केली. त्यानंतर या तिघांनी सीमाला कारमध्ये बसवले. 

हा प्रकार सुरू असताना मुलीला जाग आली. तिने आरोपीला विचारले असता त्याने आईला डॉक्टरकडे नेतोय, दरवाजा लाव असं सांगितले. त्यानंतर आरोपी सागरच्या दिशेने निघाला. रस्त्यात त्याने सासरे आणि मेहुण्याला फोन करून सीमाची तब्येत बिघडल्याचे सांगितले. परंतु षडयंत्र भलतेच काही होते. पहाटे ४ च्या सुमारास गढाकोटा रोडवरील चनाटोरियाजवळ निर्जनस्थळी कार पोहचली. त्याने कार बाजूला घेत पत्नीच्या शरीरावर आणि कारवर पेट्रोल टाकून दोघांना आग लावली. आग लागल्यानंतर तो साथीदारांसह तिथेच कार जळताना पाहत होता. कुणीही सीमाला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. या घटनेबाबत आरोपीने पोलीस आणि नातेवाईकांना वेगवेगळ्या कहाण्या सांगितल्या. कधी हार्ट अटॅक, कधी अपघात तर कधी सीएनजी ब्लास्ट...पोलिसांना सुरुवातीपासून या प्रकरणात संशय येत होता. घटनास्थळी जळालेली माचिस, कारची स्थिती आणि तांत्रिक तपासणीनंतर अनेक तथ्ये समोर आले आणि त्यातून या घटनेचा पर्दाफाश झाला.

तपासात काय झालं उघड?

पोलिसांनी घटनेचा तपास केला असता त्यात निलेशचे एका युवतीसोबत अफेअर सुरू असल्याचं समोर आले. ज्यातून पती पत्नी यांच्यात बराच काळापासून वाद होता. पत्नीने विरोध केल्यानंतर निलेशने तिचा काटा काढण्याचं ठरवले. पोलिसांनी आरोपीच्या घरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले परंतु त्यात काही सापडले नाही. सीमाचा मृत्यू गळा दाबून झाला की जळाल्याने झाला याबाबत पोस्टमोर्टम रिपोर्टची वाट पाहिली जात आहे. सध्या या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी निलेशसह दोघांना अटक केली आहे. या तिघांविरोधात हत्या आणि पुरावे मिटवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Doctor murdered wife, burned car 50km away: Gruesome crime revealed.

Web Summary : A doctor in Madhya Pradesh murdered his wife, staging a car accident 50km away to conceal the crime. He strangled her after an argument, then burned the body with accomplices. Police suspected foul play and arrested the doctor and his accomplices.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी