शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

नवरा कामासाठी दुबईला, भाच्याच्या प्रेमात वेडी झाली बायको; १० लाखांचे दागिने घेऊन गेली पळून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 11:49 IST

एक महिला आपल्या तीन वर्षांच्या मुलीला सोडून मानलेल्या भाच्यासोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातून नात्याला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एक महिला आपल्या तीन वर्षांच्या मुलीला सोडून मानलेल्या भाच्यासोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिचा पती आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दुबईत राहून मेहनत करत होता.

या दोघांचे प्रेमसंबंध उघड झाल्यानंतर घरच्यांनी त्यांना आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं होतं आणि त्यांना समज देण्याचा प्रयत्नही केला होता. पतीला याची माहिती मिळताच त्याने दुबईतून फोन करून पत्नीला विनंती केली, तिचे पाय धरले, पण ती प्रेमात इतकी वेडी झाली की तिने कोणाचंही ऐकलं नाही. अखेर २४ डिसेंबरच्या रात्री ती घर सोडून पळून गेली.

१० लाखांचे दागिने आणि रोकड लंपास

पतीच्या दाव्यानुसार, पत्नी घरातून पळून जाताना सोबत सुमारे १० लाख रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन गेली आहे. ३८ वर्षीय व्यक्तीचं ५ वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. पत्नी आणि मुलीचं भविष्य उज्ज्वल व्हावं, यासाठी तो परदेशात काम करत होता. मात्र पत्नी स्वतःपेक्षा दोन वर्षांनी लहान असलेल्या तरुणाच्या प्रेमात इतकी आंधळी झाली की तिने समाजाची पर्वा केली नाही.

इन्स्टाग्रामवर शेअर केले लग्नाचे फोटो

मिळालेल्या माहितीनुसार, घरातून पळून गेल्यानंतर या दोघांनी लग्न केलं असून त्याचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. घटनेची माहिती मिळताच २९ डिसेंबर रोजी पती दुबईहून आपल्या गावी परतला आणि त्याने बनकटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. बनकटा पोलीस ठाण्याचे प्रभारी विशाल उपाध्याय यांनी सांगितलं की, पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Wife elopes with nephew, lover, steals jewels while husband works abroad.

Web Summary : A woman in Uttar Pradesh abandoned her child and fled with her nephew while her husband worked in Dubai. After being caught in a compromising position, she ignored her husband's pleas and ran away with ₹10 lakh in jewelry and cash. They reportedly married and posted photos online. Police are investigating.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्न