दिल्ली हादरली! दोन तरुण मुलींची हत्या करून आईने केला स्वतःला संपवण्याचा प्रयत्न; का झाली इतकी कठोर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 09:06 IST2026-03-06T09:06:07+5:302026-03-06T09:06:42+5:30

एका मातेने आपल्या ३३ आणि २८ वर्षांच्या दोन सख्ख्या लेकींची निर्घृण हत्या करून स्वतःचे जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Delhi shocked! Mother tried to commit suicide by killing two young daughters; Why was she so cruel? | दिल्ली हादरली! दोन तरुण मुलींची हत्या करून आईने केला स्वतःला संपवण्याचा प्रयत्न; का झाली इतकी कठोर?

AI Generated Image

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या मालवीय नगर परिसरात गुरुवारी एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका मातेने आपल्या ३३ आणि २८ वर्षांच्या दोन सख्ख्या लेकींची निर्घृण हत्या करून स्वतःचे जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण दक्षिण दिल्लीत खळबळ उडाली असून, रक्ताच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या कृत्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

बंद दरवाजा आणि आतलं विदारक दृश्य!

५ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी ६:१० च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मालवीय नगरमधील एका घरातून बराच वेळ प्रतिसाद मिळत नसल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडला असता, आतले दृश्य पाहून अधिकाऱ्यांच्याही पायाखालची जमीन सरकली. दोन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये दोन बहिणींचे मृतदेह पडले होते, तर त्यांची आई बेशुद्धावस्थेत रक्ताच्या थारोळ्यात होती.

एकीची उशीने तर दुसरीची गळफास लावून हत्या?

प्राथमिक तपासात समोर आलेले वास्तव अत्यंत भयानक आहे. एका खोलीत थोरल्या मुलीचा मृतदेह होता, जिच्या चेहऱ्यावर उशी ठेवून तिचा श्वास रोखल्याचे निशाण होते. तर दुसऱ्या खोलीत धाकट्या मुलीचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी तातडीने आईला 'एम्स'च्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे.

सर्वात मोठा प्रश्न- आईने असे का केले?

दिल्ली पोलिसांसमोर आता सर्वात मोठे आव्हान आहे ते म्हणजे या हत्याकांडामागचे कारण शोधणे. ३३ आणि २८ वर्षांच्या ऐन तारण्यातील मुलींना एका आईने मृत्यूच्या दारात का ढकलले? यामागे घरगुती वाद होता, मानसिक आजारपण की भविष्याबद्दलची एखादी अनामिक भीती? पोलीस आता या सर्व बाजूने तपास करत आहेत. प्राथमिक पुराव्यांवरून ही 'मर्डर कम सुसाईड'ची केस वाटत असली, तरी आई शुद्धीवर आल्यावरच यामागचे गूढ उकलणार आहे.

तपासाची चक्रे फिरली

या घटनेनंतर एफएसएल आणि क्राईम टीमने तासनतास घराची झडती घेऊन पुरावे गोळा केले आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, मृत्यूची नेमकी वेळ आणि पद्धत लवकरच स्पष्ट होईल. दरम्यान, या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे. शेजारी आणि नातेवाईकांची चौकशी करून पोलीस या धक्कादायक पाऊलामागचे ट्रिगर शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

Web Title : दिल्ली में सनसनी: माँ ने बेटियों की हत्या कर आत्महत्या का प्रयास किया

Web Summary : दिल्ली में एक माँ ने अपनी दो बेटियों की हत्या कर दी और आत्महत्या का प्रयास किया। पड़ोसियों द्वारा कोई प्रतिक्रिया न मिलने पर पुलिस ने शवों को खोजा। मकसद अज्ञात है, जांच पारिवारिक विवादों, मानसिक स्वास्थ्य और भविष्य के बारे में आशंकाओं पर केंद्रित है। मां अस्पताल में है, और मामले की जांच हत्या-आत्महत्या के रूप में की जा रही है।

Web Title : Delhi Shaken: Mother Kills Daughters, Attempts Suicide; Gruesome Act

Web Summary : In Delhi, a mother murdered her two daughters and attempted suicide. Police discovered the bodies after neighbors reported no response. The motive is unknown, with investigations focusing on family disputes, mental health, and fears about the future. The mother is hospitalized, and the case is being investigated as a possible murder-suicide.