शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Blast : 'दहशतवादी डॉक्टरांना' कुठून मिळत होतं फंडिंग? शाहीनच्या अकाऊंटमधून धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 13:00 IST

Delhi Blast : लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या काही तास आधी जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गजवत-उल-हिंदशी संबंधित दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आला. तीन डॉक्टरांसह आठ जणांना अटक करण्यात आली.

लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या काही तास आधी जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गजवत-उल-हिंदशी संबंधित दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आला. तीन डॉक्टरांसह आठ जणांना अटक करण्यात आली. सोमवारी अटक करण्यात आलेल्यांमध्ये फरीदाबादमधील अल फलाह विद्यापीठातील डॉ. मुझम्मिल गनई आणि डॉ. शाहीन सईदचा समावेश आहे. तपास यंत्रणा आता जैश-ए-मोहम्मदच्या फरीदाबाद मॉड्यूलच्या दहशतवादी फंडिंगची चौकशी करत आहेत. समोर झालेल्या माहितीनुसार, डॉ. शाहीन सईदला दहशतवादी संघटना जैशकडून फंडिंग मिळत होतं.

जैशच्या सांगण्यावरून शाहीन पश्चिम उत्तर प्रदेशातील विविध ठिकाणी महिला विंगसाठी रिक्रूटमेंट सेंटर सुरू करण्याचं काम करत होती. शाहीन शहराच्या बाहेरील भागात आणि माणसांची कमी वर्दळ असलेल्या सहारनपूर आणि हापूरमध्ये मिनी रिक्रूट-कमांड सेंटरसाठी जागा शोधत होती.

व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल! दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी एका डॉक्टरला घेतलं ताब्यात

"दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा

कोण आहे डॉ. शाहीन सईद?

- फरिदाबादमध्ये २,९०० किलो स्फोटकं जप्त केल्यानंतर पोलिसांनी तीन डॉक्टरांसह आठ जणांना अटक केली.

- अटक केलेल्या लोकांमध्ये शाहीनचा समावेश आहे. ती मूळची लखनौची रहिवासी आहे.

- शाहीनवर भारतातील जैश-ए-मोहम्मदच्या महिला भरती शाखेचा भाग असल्याचा गंभीर आरोप आहे.

- शाहीन पाकिस्तानमधील तिच्या हँडलरच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जातं.

- दहशतवादी कारवायांसाठी शक्य तितक्या जास्त महिलांची भरती करण्याचे निर्देश तिला देण्यात आले होते.

- शाहीनचा महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या जफर हयातशी निकाह झाला होता. २०१५ मध्ये तलाक झाला.

- तलाकनंतर शाहीन हरियाणातील फरिदाबाद येथील अल फलाह विद्यापीठात सहभागी झाली आणि तिथे एकटीच राहिली.

 "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर

२६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा

जैश-ए-मोहम्मदच्या माध्यमातून या मॉड्यूलला शाहीन फंडिंग करत असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. तपास यंत्रणा शाहीन, आदिल, उमर आणि मुझम्मिल यांच्या अकाऊंटची तपासणी करत आहेत. शाहीनच्या अकाऊंटमध्ये विदेशी फंडिंगचेही पुरावे सापडले आहेत आणि शाहीनची याबाबत सतत चौकशी केली जात आहे. मौलवी इरफान अहमद हा जैशच्या एका कमांडरच्या संपर्कात होता आणि त्याला जैशकडून फंडिंग मिळत होतं.

English
हिंदी सारांश
Web Title : Doctor's terror funding: Shocking details emerge from Shaheen's account.

Web Summary : Investigation reveals terror funding to Dr. Shaheen Saeed from Jaish-e-Mohammed. She recruited women in Uttar Pradesh. Accounts are scrutinized, revealing foreign funding. Arrests followed explosive seizures, exposing a terror module.
टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारीBlastस्फोटcarकारTerrorismदहशतवादTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादी