Ananya Panday, Aryan Khan Drug Case:आर्यन खानला ड्रग्ज कोण पुरवायचा त्याचे नाव समजले; अनन्या पांडेनेच एनसीबीला सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 03:44 PM2021-10-23T15:44:14+5:302021-10-23T15:54:23+5:30

Ananya Panday, Aryan Khan Drug Case: एनसीबीने या तरुणाला मालाड येथून ताब्यात घेतले आहे. आता त्याची चौकशी करून अनन्याला सोमवारी प्रश्न विचारले जाणार आहेत.

Cruise Drug Case: Ananya Panday Knows big celebrity's House-help, Who Supplied Drugs to Aryan Khan | Ananya Panday, Aryan Khan Drug Case:आर्यन खानला ड्रग्ज कोण पुरवायचा त्याचे नाव समजले; अनन्या पांडेनेच एनसीबीला सांगितले

Ananya Panday, Aryan Khan Drug Case:आर्यन खानला ड्रग्ज कोण पुरवायचा त्याचे नाव समजले; अनन्या पांडेनेच एनसीबीला सांगितले

Next

मुंबई क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणी (Cruise Drugs Case) आर्यन खानमुळे (Aryan Khan) बॉलिवूड अॅक्ट्रेस अनन्या पांडेला (Ananya Panday) एनसीबीच्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे. दोन दिवसांपासून अनन्या पांडेची सहा तास चौकशी करण्यात आली आहे. आता पुन्हा तिला सोमवारी चौकशीला बोलविण्यात आले आहे. यामागे तिने मोबाईलमधील चॅट आणि कॉन्टॅक्ट डिलीट केल्याचा संशय आहे. अनन्याने एनसीबीला आर्यन खानला कोण ड्रग्ज पुरवते त्याची माहिती दिली आहे. 

अनन्याने कोणत्यातरी सेलिब्रिटीचा नोकर (House-Help) हे ड्रग्ज पुरवतो, असे एनसीबीला सांगितल्याचे समजते आहे. आर्यन खानला ड्रग्ज पुरविणाऱ्या व्यक्तीला आपण ओळखते असे तिने एनसीबीला सांगितले आहे. शनिवारी समोर आलेल्या मीडिया रिपोर्टमध्ये दावा केला जात आहे की, एनसीबीने 24 वर्षांच्या एका हाऊस हेल्परची चौकशी केली आहे. हा तरुण एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी काम करतो. हा तोच तरुण आहे जो कथितरित्या अनन्याच्या सांगण्यावरून आर्यनला ड्रग्ज देत होता. एनसीबीने या तरुणाला मालाड येथून ताब्यात घेतले आहे. आता त्याची चौकशी करून अनन्याला सोमवारी प्रश्न विचारले जाणार आहेत. 

तर अनन्या पांडेलादेखील अटक होऊ शकते...
आर्यन खानला एनसीबीने 2 ऑक्टोबरला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझवरून ताब्यात घेतले होते. त्याच्यासह अन्य 8 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. नंतर त्यांना अटक करण्यात आली. आर्यन खानला 30 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. जर सोमवारपर्यंत एनसीबीला ठोस पुरावे सापडले तर अनन्या पांडेला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. 

संबंधित बातमी....

Ananya Panday: चौकशीला जाण्यापूर्वी अनन्या पांडे मोठा 'गेम' खेळली; एनसीबी बुचकळ्यात पडली

Aryan Khan Drug Case: अनन्या पांडे म्हणते गांजाचे चॅट ही तर मस्करी!

 

Read in English

Web Title: Cruise Drug Case: Ananya Panday Knows big celebrity's House-help, Who Supplied Drugs to Aryan Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app