Aryan Khan Drug Case: अनन्या पांडे म्हणते गांजाचे चॅट ही तर मस्करी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 06:58 AM2021-10-23T06:58:25+5:302021-10-23T07:01:03+5:30

पुन्हा चार तास चौकशी, आर्यनसोबत व्हॉट्सॲप चॅटमुळे अडचणी वाढण्याची शक्यता

Ananya Panday agreed to arrange ganja for Aryan When asked by NCB said was joking | Aryan Khan Drug Case: अनन्या पांडे म्हणते गांजाचे चॅट ही तर मस्करी!

Aryan Khan Drug Case: अनन्या पांडे म्हणते गांजाचे चॅट ही तर मस्करी!

Next

मुंबई : अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याच्यासोबत असलेल्या ड्रग्ज चॅटवरून राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) अभिनेत्री अनन्या पांडे हिच्याकडे सलग दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी चार तास कसून चौकशी केली. तिने मस्करीमध्ये आर्यनसोबत ड्रग्ज चॅट केल्याचा दावा केला आहे. याबाबत एनसीबी अधिक तपास करीत आहेत. गांजाचा उल्लेख व्हॉट्सॲप चॅटमध्ये असला तरी तो विनोदाने केला होता. आपण कधीही ड्रग्ज घेतलेले नाही, असा दावा अनन्या पांडे हिने चौकशीदरम्यान केला.

एनसीबीने २ ऑक्टोबर रोजी कॉर्डेलिया क्रूझवर छापेमारी करून आर्यन खान याच्यासह अन्य काही जणांना अटक केली. आर्यनच्या मोबाईलमध्ये ड्रग्जसंबंधी अनन्यासोबतचेही चॅट सापडले होते. एनसीबीने गुरुवारी अनन्याच्या घरी जाऊन तपासणी केली. तिचा मोबाईल आणि लॅपटॉप ताब्यात घेतला. समन्स बजावून चौकशीला बोलावले. वडील चंकी पांडे यांच्यासोबत गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास अनन्या चौकशीला हजर झाली. यावेळी एनसीबीने सुमारे अडीच तास चौकशी केली. त्यानंतर तिला पुन्हा शुक्रवारी सकाळी चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार अनन्या दुपारी अडीचच्या सुमारास चौकशीला एनसीबी कार्यालयात हजर झाली. 

एनसीबी मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे, व्ही. व्ही. सिंग आणि एका महिला अधिकाऱ्याच्या उपस्थितीत अनन्याची चौकशी झाली. आर्यनच्या मोबाईलमधील संभाषणाबाबत अनन्याकडे चौकशी करण्यात आली.  गरज पडल्यास तिला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येऊ शकते, अशीही माहिती एनसीबीकडून देण्यात आली आहे. 

आणखी एक अभिनेत्री एनसीबीच्या रडारवर
अनन्या पांडेपाठोपाठ आणखी एक अभिनेत्री एनसीबीच्या रडारवर आहे. लवकरच तिला समन्स बजाविण्यात येऊ शकते. ड्रग्ज प्रकरणात तिचाही सहभाग समोर आल्याची माहिती मिळत आहे.

Web Title: Ananya Panday agreed to arrange ganja for Aryan When asked by NCB said was joking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.