शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर पोलीस अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले; पोलीस निरीक्षकासह हवालदारावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 14:40 IST

Crime News: तक्रारदार हे काशिमीरा वाहतूक विभागात कार्यरत आहेत. त्यांना प्रकृतीअभावी किंवा अन्य कारणास्तव सोपे काम (लाईट ड्युटी) हवे होते.

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या काशिमीरा वाहतूक विभागात भ्रष्टाचाराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्याच विभागातील एका कर्मचाऱ्याला 'लाईट ड्युटी' (हल्के काम) देण्यासाठी चक्क १५,००० रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस निरीक्षकासह एका पोलीस हवालदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील तक्रारदार हे काशिमीरा वाहतूक विभागात कार्यरत आहेत. त्यांना प्रकृतीअभावी किंवा अन्य कारणास्तव सोपे काम (लाईट ड्युटी) हवे होते. ही ड्युटी लावून देण्यासाठी काशिमीरा वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सागर बा. इंगोले यांनी १५,००० रुपयांची मागणी केली होती.

तपासात असे निष्पन्न झाले की, पोलीस निरीक्षक इंगोले यांच्या सांगण्यावरून पोलीस हवालदार मनोज आ. गोल्हार याने तक्रारदाराकडे पैशांचा तगादा लावला होता. हवालदार गोल्हार याने साहेबांसाठी १५,००० रुपये, स्वतःसाठी २,५०० रुपये आणि साहेबांच्या 'रायटर'साठी (शेंडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक) २,५०० रुपये अशा एकूण लाचेची मागणी केली होती.

एसीबीची सापळा आणि पडताळणी
तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी ५ सप्टेंबर २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई येथे तक्रार नोंदवली होती. एसीबीने ५ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर २०२५ या काळात कार्यालयात विविध टप्प्यांवर पडताळणी केली. या पडताळणीत पोलीस निरीक्षक सागर इंगोले आणि हवालदार गोल्हार यांनी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.

गुन्हा दाखल आणि पुढील तपास
या प्रकरणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, ३० मार्च २०२६ रोजी काशिमीरा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ७ आणि १२ अन्वये गुन्हा (गु.र.क्र. १२७/२०२६) नोंदवण्यात आला आहे. या कारवाईचे मार्गदर्शन अपर पोलीस आयुक्त संदीप दिवाण आणि अपर पोलीस उपआयुक्त अनिल घेरडीकर यांनी केले. या प्रकरणाचा पुढील तपास आता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Corrupt Police Officers Exposed; Inspector and Constable Booked for Bribery.

Web Summary : An inspector and constable in Kashimira were booked for demanding a ₹15,000 bribe for a 'light duty' assignment. The constable pressured the complainant for the money, including shares for himself and the inspector's assistant. ACB investigations confirmed the bribe demand, leading to charges under the Prevention of Corruption Act.
टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीBribe Caseलाच प्रकरण