Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 19:51 IST2025-10-27T19:50:57+5:302025-10-27T19:51:48+5:30
दिल्लीत समलिंगी तरुण पार्टीसाठी भेटले होते. रात्रभर त्यांनी पार्टी केली. पार्टीसाठी आलेल्या शुभम नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणात दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे.

Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू
Gay Dating Crime News: ७-८ समलिंगी तरुण गे डेटिंग अपवर भेटले. ओळखीनंतर मैत्री वाढली आणि त्यांनी पार्टी करण्याचे ठरवले. नोएडातील सेक्टर ७४ मधील सुपरटेक नॉर्थ आय सोसायटीमध्ये त्यांनी शनिवारी रात्रीपासून ते रविवारी पहाटेपर्यं पार्टी केली. पण, २६ ऑक्टोबरच्या सकाळी पार्टीला आलेल्या शुभम कुमार नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. शुभम कुमारचा ८व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असून, पोलिसांनी दोन तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
पार्टीसाठी आलेल्या आणि मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव शुभम कुमार आहे. तो अलिगढचा रहिवाशी आहे. शुभम कुमार २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी काही मित्रांसोबत सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये पार्टी करण्यासाठी आला होता.
पार्टीसाठी आलेले सर्व तरुण समलिंगी डेटिंग अपवर एक दुसऱ्यांना भेटले होते. ७ ते ८ जण पार्टीसाठी आले होते. २६ ऑक्टोबर रोजी पहाटेपर्यंत त्यांनी पार्टी केली. सकाळी शुभम बाल्कनीमध्ये उभा होता, त्यावेळी तो ८व्या मजल्यावरून खाली पडला. त्याचा जागेवरच मृत्यू झाला.
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी शुभम कुमारचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. अतिरिक्त पोलीस आयुक्त सुमित शुक्ला यांनी सांगितले की, पोलिसांनी दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आवश्यक कायदेशीर कारवाई केली जात आहे.
ज्या ठिकाणावरून शुभम कुमार खाली पडला. त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासणार आहे, जेणेकरून तो खाली पडला की त्याला धक्का दिला गेला? हा अपघात होता की, घातपात याचा तपासही पोलीस करत आहेत.