कोर्टाने दिला दणका! बलात्कार प्रकरणी आरोपीला दहा वर्षांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 08:35 PM2020-09-15T20:35:51+5:302020-09-15T20:40:18+5:30

प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले. सरकार पक्षातर्फे एकुण १६ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पिडीता, तिची आई, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली.

The court gave a bang! Accused sentenced to 10 years in rape case | कोर्टाने दिला दणका! बलात्कार प्रकरणी आरोपीला दहा वर्षांची शिक्षा

कोर्टाने दिला दणका! बलात्कार प्रकरणी आरोपीला दहा वर्षांची शिक्षा

googlenewsNext
ठळक मुद्दे नांदुरा तालुक्यातील येरळी येथील पिडितेने याप्रकरणाची तक्रार पोलिसात केली होती. दंडाची रक्कम नुकसान भरपाई म्हणून पिडितेला देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.

मलकापूर : नांदुरा तालुक्यातील येरळी येथील पिडितेवर बलात्कार करणाऱ्या आरोपी लक्ष्मण विठ्ठल माटे याला दहा वर्षांची शिक्षा देण्याचा आदेश मलकापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने १५ सप्टेंबर रोजी दिला.  

नांदुरा तालुक्यातील येरळी येथील पिडितेने याप्रकरणाची तक्रार पोलिसात केली होती. त्यानुसार आरोपी लक्ष्मण विठ्ठल माटे याच्याविरूद्ध नांदुरा पोलिसांनी  भा.दं.वि. च्या विविध कलमांसह अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. आरोपीला अटक करून तपास सपोनि सचिन शिंदे (मयत) यांनी केला. प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले. सरकार पक्षातर्फे एकुण १६ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पिडीता, तिची आई, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली.

सरकार पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपी लक्ष्मण विठ्ठल माटे याला  शिक्षा ठोठावली. त्यामध्ये  १० वर्षांची शिक्षा व ५००० रु. दंड, तो न भरल्यास १ महिना कारावास, तसेच कलम ३७६ (अ)  मध्ये ७ वर्ष सक्तमजुरी, ५००० रुपए दंड, कलम ४५२ अंतर्गत ५ वर्ष सक्तमजुरीसह विविध शिक्षा सुनावल्या आहेत. दंडाची रक्कम नुकसान भरपाई म्हणून पिडितेला देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. याप्रकरणात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता शैलेश जोशी, व्ही.एम.बापट यांनी काम पाहिले.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

धक्कादायक! मंदिरात चोरट्यांनी घुसून तीन पुजाऱ्यांची केली निर्घृण हत्या 

 

दया नायक यांची धडाकेबाज कारवाई, उद्धव ठाकरेंना धमकी देणाऱ्यास केली अटक

 

‘‘आई मी जीवनाला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेतोय,मला माफ कर गं..."

 

पाकिस्तानात अब्रूचे धिंडवडे, कारमधून खेचून परदेशी महिलेवर मुलांसमोर गँगरेप

 

रियाला ना पंखा, ना बेड, भायखळा तुरुंगात नशिबी आले चटईवर झोपणं

 

उल्हासनगर पोलिसांची धडक कारवाई; खाद्य पदार्थ विकणाऱ्या दुकानावर गुन्हे

 

इडीएएल कंपनीकडून एसबीआय बँकेला 338 कोटीचा गंडा

 

शोविकचा मित्र सूर्यदीपचे बॉलिवूड, अंडरवर्ल्ड कनेक्शन असण्याची शक्यता 

 

प्रशांत भूषण यांनी भरला १ रुपयाचा दंड अन् सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका

 

दिशा सालियान आणि सुशांत राजपूत मृत्यू यामधील रोहन रॉय महत्त्वाचा दुवा; नितेश राणेंचा दावा

 

सुशांतची आत्महत्या की हत्या?, लवकरच पोस्टमॉर्टेम - व्हिसेरा अहवालातून होणार खुलासा

 

 

Web Title: The court gave a bang! Accused sentenced to 10 years in rape case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.