Sushant Singh Rajput Case : Shovik's friend Suryadeep is likely to have a Bollywood, underworld connection | शोविकचा मित्र सूर्यदीपचे बॉलिवूड, अंडरवर्ल्ड कनेक्शन असण्याची शक्यता 

शोविकचा मित्र सूर्यदीपचे बॉलिवूड, अंडरवर्ल्ड कनेक्शन असण्याची शक्यता 

ठळक मुद्देसूर्यदीप वरळीतील ज्या उच्चभ्रू वस्तीत राहतो तेथे बडे राजकारणी आणि पोलीस अधिकारी राहतात अशी माहिती मिळत आहे. शोविकचा लहानपणापासूनचा शाळेतील मित्र असलेला सूर्यदीपचं नाव तपासात समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

मुंबई - सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रगचे जाळ्याचा गुंता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. एनसीबीने आतापर्यंत १६ ते १८ जणांना अटक या प्रकरणात अटक केली आहे. या प्रकरणात एनसीबीने अजून एकामोठ्या माश्याला वरळी येथून ताब्यात घेतले. वरळी येथील उच्चभ्रू वस्तीतून एनसीबीच्या पथकाने शोविकचा मित्र सूर्यदीप मल्होत्रा याला अटक केली आहे. आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास त्याच्या वरळी येथील घरावर एनसीबीने छापा टाकला. जवळपास तीन तास ही कारवाई सुरु होती. त्यानंतर एनसीबीच्या पथकाने सूर्यदीपला ताब्यात घेतले आणि चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात नेऊन अटक केली. या आरोपीचे मुंबईतील सर्वात मोठ्या ड्रग पेडलरशी संबंध असून त्या पेडलरचा बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डशी कनेक्शन असण्याची शक्यता तपास यंत्रणेला आहे. 

सूर्यदीप वरळीतील ज्या उच्चभ्रू वस्तीत राहतो तेथे बडे राजकारणी आणि पोलीस अधिकारी राहतात अशी माहिती मिळत आहे. शोविकचा लहानपणापासूनचा शाळेतील मित्र असलेला सूर्यदीपचं नाव तपासात समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मात्र, सूर्यदीपच्या अटकेनंतर मोठा गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. कारण त्याच्या चौकशीतून मोठी माहिती उघडकीस येण्याची शक्यता आहे. सूर्यदीप ज्या ड्रग पेडलरच्या संपर्कात होता, तो मुंबईतील सर्वात मोठा ड्रग पेडलर असल्याची माहिती एनसीबीला मिळालेली आहे. त्यावरून सूर्यदीपला बेड्या ठोकण्यात आल्या आहे. त्यामुळे याच्या चौकशीत त्या ड्रग पेडलरचे बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डशी असलेले कनेक्शन समोर येण्याची शक्यता आहे.   

रिया चक्रवर्ती जेलमध्ये असे घालवत आहे दिवस

अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज जाळ्याच्या तपास करणाऱ्या एनसीबीने मुख्य आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मंगळवारी अटक केली आहे. त्यानंतर कोर्टाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आता भायखळा तुरुंगात रिया आहे. दोन वेळा रियाचा जामीन कोर्टाने फेटाळला आहे. तिचे वकील सतीश मानेशिंदे आता मुंबई हायकोर्टाचा दरवाजा ठोठावू शकतात. त्यामुळे पुढचे आणखी काही दिवस रियाच्या नशिबात भायखळा तुरुंगातील चटईवर झोपण्याची वेळ आली आहे. रियाला झोपण्यासाठी ना बेड, ना पंखा, ना उशी अशा अवस्थेत रिया दिवस घालवत आहे.

न्य महत्वाच्या बातम्या...

धक्कादायक! मंदिरात चोरट्यांनी घुसून तीन पुजाऱ्यांची केली निर्घृण हत्या 

दया नायक यांची धडाकेबाज कारवाई, उद्धव ठाकरेंना धमकी देणाऱ्यास केली अटक

‘‘आई मी जीवनाला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेतोय,मला माफ कर गं..."

पाकिस्तानात अब्रूचे धिंडवडे, कारमधून खेचून परदेशी महिलेवर मुलांसमोर गँगरेप

रियाला ना पंखा, ना बेड, भायखळा तुरुंगात नशिबी आले चटईवर झोपणं

उल्हासनगर पोलिसांची धडक कारवाई; खाद्य पदार्थ विकणाऱ्या दुकानावर गुन्हे

Web Title: Sushant Singh Rajput Case : Shovik's friend Suryadeep is likely to have a Bollywood, underworld connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.