CoronaVirus वडिलांच्या आजारपणाचा बनाव रचत अ‍ॅम्बुलन्सने दिल्लीला गेला; लग्न करूनच परतला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 02:41 PM2020-04-30T14:41:23+5:302020-04-30T14:43:15+5:30

CoronaVirus Lockdown लॉकडाऊनमध्येही दिल्लीहून सून आणल्याचा आनंद फार काळ टिकला नाही. शेजाऱच्या कोणीतरी पोलिसांना याची माहिती दिली आणि पोलखोल झाली. 

CoronaVirus UP man took benefit of ambulance to get married with delhi girl hrb | CoronaVirus वडिलांच्या आजारपणाचा बनाव रचत अ‍ॅम्बुलन्सने दिल्लीला गेला; लग्न करूनच परतला

CoronaVirus वडिलांच्या आजारपणाचा बनाव रचत अ‍ॅम्बुलन्सने दिल्लीला गेला; लग्न करूनच परतला

Next

 मुजफ्फरनगर : लॉकडाऊनमुळे ठिकठिकाणी लोक अडकलेले आहेत. त्यांची कामे, समारंभ सारे काही खोळंबलेले आहे. या काळात आपत्कालीन स्थितीत सरकारने काही पर्याय दिले आहेत. मात्र, त्यांचा गैरवापर करणारेही बरेच आहेत. घरी जाण्यासाठी पोलिसांनी पकडल्यानंतर नानाविध बहाने बनवत आहेत. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडला आहे. या पठ्ठ्याने वडिलांच्या आजारपणाचा फायदा घेत दिल्ली गाठून लग्न करत पुन्हा माघारी आला आहे. 


२६ वर्षांच्या अहमदने दिल्लीला जाण्यासाठी अ‍ॅम्बुलन्स बुक केली. त्याने त्याचे वडील आजारी असल्याचा बहाना बनविला आणि त्यांना ड्रिप लावून स्ट्रेचरवर झोपविले. वाटेत त्याने कित्येक चेक पोस्ट, पोलिसांना गुंगारा देत दिल्ली गाठली. दिल्लीला गेल्यानंतर त्यांने तिथे ठरलेल्या मुलीसोबत लग्न केले. यानंतर तो जसा गेला तसा अ‍ॅम्बुलन्सनेच नववधूला घेऊन माघारी आला. मात्र, लॉकडाऊनमध्येही दिल्लीहून सून आणल्याचा आनंद फार काळ टिकला नाही. शेजाऱच्या कोणीतरी पोलिसांना याची माहिती दिली आणि पोलखोल झाली. 


अहमद ज्या भागात राहतो तो भाग मुझफ्फरनगरचा खतौली भाग आहे. महत्वाचे म्हणजे हा भाग कोरोनाचा हॉटस्पॉट आहे. या प्रतापाची माहिती मिळताच पोलीस आणि आरोग्यविभागची टीम अहमदच्या घरी धडकली. येथे त्याच्या कुटुंबाच्या प्रत्येकाचा स्वॅब नमुना घेण्यात आला आणि अख्ख्या परिवाराला १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे. 


अ‍ॅम्बुलन्सच्या चालकाविरोधातही गुन्हा
अहमदने चार दिवस आधीही दिल्ली जाण्याचा प्रयत्न केला होता. अप्पर गंगा कॅनॉलच्या मार्गाने जात असताना पोलिसांनी त्याला आणि त्याचे वडील इसरार यांना अर्ध्या वाटेतूनच माघारी पाठविले होते. आता पोलिसांनी अॅम्बुलन्सच्या चालकाविरोधातही गुन्हा नोंदविला आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

CoronaVirus Lockdown जेवढा लॉकडाऊन वाढणार तेवढ्या जास्त नोकऱ्या जाणार; संयुक्त राष्ट्राचा इशारा

CoronaVirus Lockdown सरकारी कंपनी 'धमाका' करणार; यंदा ६००० कर्मचाऱ्यांची बंपर भरती काढणार

दिलासादायक! अडकलेले मजूर, विद्यार्थी घरी जाऊ शकणार; गृह मंत्रालयाकडून सूचना

11 वर्षांनी पुन्हा येणार, २०७९ वर्ष धोक्याचे; पृथ्वीच्या जवळून गेले मोठे संकट

CoronaVirus पुण्याच्या प्रसिद्ध कंपनीने घेतली मोठी 'रिस्क'; 1000 रुपयांत कोरोना लस आणणार

Web Title: CoronaVirus UP man took benefit of ambulance to get married with delhi girl hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.