CoronaVirus Lockdown लॉकडाऊन वाढल्यास ३० कोटी नोकऱ्यांवर गदा येणार; संयुक्त राष्ट्राचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 01:12 PM2020-04-30T13:12:22+5:302020-04-30T17:12:42+5:30

आयएलओने गेल्या वेळी आठवड्याला ४८ तासांचे काम करणाऱ्यांपैकी १९.५ कोटी फुल टाईम नोकऱ्या जाणार असल्याचे म्हटले होते. मात्र आता जगातील लॉकडाऊन वाढण्याची परिस्थिती पाहता हा आकडा वाढविला आहे.

CoronaVirus if Lockdown Increased, 30 crore people lost jobs world wide; UN warning hrb | CoronaVirus Lockdown लॉकडाऊन वाढल्यास ३० कोटी नोकऱ्यांवर गदा येणार; संयुक्त राष्ट्राचा इशारा

CoronaVirus Lockdown लॉकडाऊन वाढल्यास ३० कोटी नोकऱ्यांवर गदा येणार; संयुक्त राष्ट्राचा इशारा

Next

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे मृत्यूंची संख्या दोन लाखांहून अधिक झालेली असताना संयुक्त राष्ट्राने गेल्याच आठवड्यात कोरोनामुळे आलेल्या संकटात भूकबळींची संख्या १२ ते २५ कोटीवर जाण्याची भीती व्यक्त केली होती. आता याच युएनशी संबंधीत आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने जगभरातील देशांना मोठा इशारा दिला आहे. 


आयएलओने गेल्या वेळी आठवड्याला ४८ तासांचे काम करणाऱ्यांपैकी १९.५ कोटी फुल टाईम नोकऱ्या जाणार असल्याचे म्हटले होते. आता या अंदाजामध्ये वाढ केली असून हा आकडा ३० कोटींवर नेला आहे. संगठनेने म्हटले आहे की, महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जगभरात लॉकडाऊन वाढविण्यात येणार असल्याने या अंदाजामध्ये बदल करण्यात आला आहे. जेवढे लॉकडाऊन वाढेल तेवढ्या जास्त नोकऱ्या धोक्यात असणार आहेत. या जागतिक महामारीमुळे जगभरातील १.६ अब्ज असंगठीत क्षेत्रातील कामगारांच्या उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे. ही संख्या जगातील ३.३ अब्ज एकूण कामगारांच्या निम्मी आहे. 


संयुक्त राष्टाच्या या शाखेने सांगितले की, रिटेल आणि मॅन्युफॅक्चरिंग रिस्कसारख्या क्षेत्रातील तब्बल ४३ कोटीहून अधिक कंपन्यांवर सर्वाधिक धोका आहे. आयएलओनुसार लॉकडाऊनमुळे पहिल्या महिन्यात कामगारांच्या उत्पन्नात ६० टकक्यांची घट दिसून आली. तर आफ्रिका, अमेरिकेमध्ये ८० टक्क्यांहून जास्त घट नोंदविली गेली. युरोप आणि मध्य आशियामध्ये ७० टक्के आणि प्रशांत क्षेत्रामध्ये २१.६ टक्क्यांची घट दिसून आली आहे. 


आयएलओचे महासंचालक गाय रायडर यांनी सांगितले की, महामीर आणि नोकऱ्यांचे संकट पाहता जगातील सर्वात दुबळ्या असलेल्या कामगारवर्गाचे रक्षण करणे जास्त गरजेचे बनले आहे. जर उत्पन्नच नाही तर त्यांच्यासाठी ना जेवण, ना सुरक्षा आणि ना ही त्यांचे काही भविष्य उरणार आहे. जगभरातील लाखो व्यवसाय संकटात आहेत. त्यांच्यापाशी कोणताही पैसा नाही आणि कर्जही घेण्याची परिस्थीती उरली आहे. हे कामगारच जगाचा खरा चेहरा आहेत. जर आता त्यांच्यासाठी काही मदत केली नाही तर ते बरबाद होणार आहेत. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

CoronaVirus Lockdown सरकारी कंपनी 'धमाका' करणार; यंदा ६००० कर्मचाऱ्यांची बंपर भरती काढणार

दिलासादायक! अडकलेले मजूर, विद्यार्थी घरी जाऊ शकणार; गृह मंत्रालयाकडून सूचना

11 वर्षांनी पुन्हा येणार, २०७९ वर्ष धोक्याचे; पृथ्वीच्या जवळून गेले मोठे संकट

CoronaVirus पुण्याच्या प्रसिद्ध कंपनीने घेतली मोठी 'रिस्क'; 1000 रुपयांत कोरोना लस आणणार

Web Title: CoronaVirus if Lockdown Increased, 30 crore people lost jobs world wide; UN warning hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.