CoronaVirus Lockdown सरकारी कंपनी 'धमाका' करणार; यंदा ६००० कर्मचाऱ्यांची बंपर भरती काढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 12:13 PM2020-04-30T12:13:00+5:302020-04-30T12:14:41+5:30

लॉकडाऊनमुळे ही प्रक्रिया थंडावली आहे. मात्र, लॉकडाऊन उठल्यानंतर ही य़ा जागा भरण्यात येणार आहेत. कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत. तसेच यंदा अनेकजण निवृत्तही होत आहेत. यामुळे ही भरती करण्यात येणार आहे. 

CoronaVirus Lockdown Coal India will recruit 6000 employees this year hrb | CoronaVirus Lockdown सरकारी कंपनी 'धमाका' करणार; यंदा ६००० कर्मचाऱ्यांची बंपर भरती काढणार

CoronaVirus Lockdown सरकारी कंपनी 'धमाका' करणार; यंदा ६००० कर्मचाऱ्यांची बंपर भरती काढणार

Next

कोलकाता : विक्री घटल्याने अडचणींचा सामना करणाऱ्या कोल इंडियाकडून यंदा एग्जिक्यूटिव्ह आणि नॉन-एग्जिक्यूटिव जागांवर मोठी पदभरती करण्यात येणार आहे. हा आकडा जवळपास ६००० एवढा असून लॉकडाऊन संपल्यानंतर ही भरती राबविण्यात येणार असल्याचे या सरकारी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितले आहे. 


कोल इंडिया आणि तिच्या संलग्न कंपन्या यंदा मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची भरती करणार आहेत. लॉकडाऊनमुळे ही प्रक्रिया थंडावली आहे. मात्र, लॉकडाऊन उठल्यानंतर ही य़ा जागा भरण्यात येणार आहेत. कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत. तसेच यंदा अनेकजण निवृत्तही होत आहेत. यामुळे ही भरती करण्यात येणार आहे. 


कंपनीच्या संलग्न कंपन्यांमध्ये मायनिंग सरदार, ओव्हरमॅन, सुपरवायझर आणि सेफ्टी ऑफिसरच्या जागा भरण्याची मंजुरी मिळालेली आहे. यंदा या संलग्न कंपन्या एकूण १००० पेक्षा जास्त कामगारांची भरती करणार आहे. 
कंपनी प्रकल्पांमुळे विस्थापित झालेल्या कुटुंबांनाही नोकरी देते. कोरोना संकटामुळे काही राज्यांमध्ये हे जमिन अधिग्रहण धीम्या गतीने सुरु आहे. मात्र, लॉकडाऊननंतर हा वेग वाढवून आणखी ५०० ते ६०० नोकऱ्या दिल्या जाणार आहेत. 

कोल इंडियाच्या संलग्न कंपन्या पॅरामेडिकल स्टाफचीही भरती करतात. तसेच कोल इंडियाच्या मंजुरीनंतर इक्विपमेंट ऑपरेटर, टेक्निशिअन, इलेक्ट्रीशिअन आणि हेल्परसह अन्य जागा भरल्या जातात. नॉर्दर्न कोलफिल्ड्स ५०० जागा भरण्याची प्रक्रिया पूर्ण करत आहे. तर आणखी १००० जागांसाठी प्रस्ताव दिला आहे. सेंट्रल कोलफील्डमध्ये १०० जागा रिक्त आहेत. या पदांवर १६०० लोकांना नोकरी देण्यात येणार आहे. एक्झिक्युटीव्ह केडरच्या रिक्त जागा विभागीय परीक्षा आणि मुलाखतीनंतर भरल्या जातात. याद्वारे १५०० ते १७०० जागा भरण्यात येणार आहेत, असे या अधिकाऱ्याने सांगितले. 


रेल्वेनंतर कोल इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातली नोकऱ्या देणारी दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. कोल इंडियाकडे सध्या २.८ लाख कर्मचारी आहेत. ज्यामध्ये १९००० एक्झिक्युटीव्ह आणि अन्य नॉन एक्झिक्युटीव्ह व कामगार आहेत. कोल इंडियातून दरवर्षी १०००० कर्मचारी निवृत्त होतात. गेल्या वर्षी कंपनीने ८००० लोकांची भरती केली होती. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

दिलासादायक! अडकलेले मजूर, विद्यार्थी घरी जाऊ शकणार; गृह मंत्रालयाकडून सूचना

11 वर्षांनी पुन्हा येणार, २०७९ वर्ष धोक्याचे; पृथ्वीच्या जवळून गेले मोठे संकट

CoronaVirus पुण्याच्या प्रसिद्ध कंपनीने घेतली मोठी 'रिस्क'; 1000 रुपयांत कोरोना लस आणणार

Web Title: CoronaVirus Lockdown Coal India will recruit 6000 employees this year hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.