शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस नेत्याच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी; ३ कोटी रूपये केले हडप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 21:30 IST

Congress leader's son threatened : या दरम्यान पोलिस पथकावर पुष्पेंद्रच्या कुटुंबियांनी हल्ला केला.

ठळक मुद्देआपला मुलगा मनोजला जिवे मारण्याची धमकी देऊन ३ कोटी रुपये हडपल्याबद्दल चितळवानाचे माजी उपप्रमुख लक्ष्मीचंद गांधी यांनी शांतीलाल, पुष्पेंद्रसिंग, भरतसिंग, किशन यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

जलोरः जलोर जिल्ह्यातील चितळवाना पोलिस स्टेशनच्या हद्दीत काँग्रेस नेते लक्ष्मीचंद गांधी यांचा मुलगा मनोजला जीवे मारण्याची धमकी देऊन तीन कोटी रुपये वसूल केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. आपला मुलगा मनोजला जिवे मारण्याची धमकी देऊन ३ कोटी रुपये हडपल्याबद्दल चितळवानाचे माजी उपप्रमुख लक्ष्मीचंद गांधी यांनी शांतीलाल, पुष्पेंद्रसिंग, भरतसिंग, किशन यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी शांतीलाल, किशनलाल आणि भरत कुमार यांना अटक केली आणि त्यांची चौकशी केली. या प्रकरणात या तिन्ही दोषींना अटक करण्यात आली असून तीन स्विफ्ट कार जप्त केल्या आहेत. लक्ष्मीचंद यांचा मुलगा मनोज कुमार यांना धमकावताना त्याने पैसे हडप करण्यासाठी संभाषणासाठी वापरलेला मोबाइल फोन जप्त करण्यात आला आहे.आरोपी शांतीलाल पुरोहित यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी २५ लाख रुपये उकलण्याचा हेतूने जीवे मारण्याची भीती दाखवली. दोन तीन दिवसांपूर्वी पीडित मनोजकडे 50 लाखांची मागणी केली आणि आरोपी पुष्पेंद्र यांनी पीडित मनोज कुमारकडून २५ लाख रुपये जीवे मारण्याची भीती दाखवून हडप केले. त्याच वेळी फरार आरोपी पुष्पेंद्रला अटक करण्यासाठी त्याच्या घरी गेलेल्या सांचोर सीओच्या नेतृत्वात  झाब  व चितळवाना पोलिसांनी छापा टाकला.या दरम्यान पोलिस पथकावर पुष्पेंद्रच्या कुटुंबियांनी हल्ला केला. यात  झाब  पोलीस ठाण्याचे पोलीस अनु चौधरी आणि एक महिला हवालदार जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार तीन कोटींच्या खंडणीचे प्रकरण राजस्थानमधील आतापर्यंतचे सर्वात मोठे प्रकरण आहे. फरार आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी छापा टाकला. आरोपींनी हडप केलेले लाखो रुपये जप्त करण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. 

टॅग्स :ExtortionखंडणीPoliceपोलिसRajasthanराजस्थानArrestअटकcongressकाँग्रेस