पॅन्ट खोलून कंपाउंडरने केले घृणास्पद कृत्य, आजारी आईसाठी औषध घेण्यासाठी गेली होती चिमुरडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 20:21 IST2022-02-16T20:20:30+5:302022-02-16T20:21:24+5:30
Pocso Case : १४ फेब्रुवारीच्या रात्री या भागातील मिठी कोठीचा रास्ता येथे राहणारी ९ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या आईसाठी औषध घेण्यासाठी परिसरात असलेल्या सीआयएफए क्लिनिकमध्ये पोहोचली.

पॅन्ट खोलून कंपाउंडरने केले घृणास्पद कृत्य, आजारी आईसाठी औषध घेण्यासाठी गेली होती चिमुरडी
जयपूर : रामगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत औषध घेण्यासाठी गेलेल्या ९ वर्षीय मुलीसोबत कंपाउंडरने अश्लील कृत्य केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. रामगंज पोलिसांनी सांगितले की, १४ फेब्रुवारीच्या रात्री या भागातील मिठी कोठीचा रास्ता येथे राहणारी ९ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या आईसाठी औषध घेण्यासाठी परिसरात असलेल्या सीआयएफए क्लिनिकमध्ये पोहोचली.
मुलीने क्लिनिकमध्ये उपस्थित , पहाडगंज येथील रहिवासी असलेल्या कंपाउंडर मोहम्मद अझलान याला डॉक्टरबद्दल विचारणा केली. अजलानने सांगितले की, डॉक्टर क्लिनिकमध्ये नाहीत. यावर मुलीने कंपाउंडरकडे तिच्या आईचे औषध मागितले, कंपाउंडरने मुलीला गोळी दिली आणि ट्यूब देण्यासाठी मुलीला ड्रेसिंग रूममध्ये नेले. यादरम्यान कंपाउंडरने तरुणीसोबत अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली, त्यानंतर कम्पाउंडर अझलानने त्याची पॅन्ट उघडून त्याचे गुप्तांग मुलीला दाखवले. कंपाउंडरच्या या कृत्याने तरुणी घाबरली आणि संधी मिळताच मुलीने तेथून पळ काढला. मुलीने घरी जाऊन हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला.
नातेवाइकांच्या माहितीवरून रामगंज पोलिस स्टेशन आणि रामगंजचे एसीपी सुनील प्रसाद शर्मा घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी क्लिनिकमधूनच कंपाउंडर मोहम्मद अजनानला अटक केली. मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत.