शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

चित्रा वाघ बीकेसी पोलीस ठाण्यात; मॉर्फ केलेल्या फोटोविरोधात केली तक्रार 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2021 3:32 PM

Cyber Crime : आता या प्रकारात मुंबई पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे.

ठळक मुद्देया प्रकरणी चित्रा वाघ यांनी आज बीकेसी पोलीस ठाण्यात जाऊन सायबर विभागाच्या पोलीस उपायुक्त रेश्मी करंदीकर यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी संजय राठोड यांच्यावर आक्रमकपणे टीका करणाऱ्या भाजपा महिला नेत्या चित्रा वाघ यांचा फोटो मॉर्फ केल्याप्रकरणी  राजकारण जबरदस्त तापले होते. या प्रकरणी चित्रा वाघ यांनी आज बीकेसी पोलीस ठाण्यात जाऊन सायबर विभागाच्या पोलीस उपायुक्त रेश्मी करंदीकर यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.फोटो व्हायरल झाल्यानंतर चित्रा वाघ यांनी फोटोंसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तक्रार केली होती. आता या प्रकारात मुंबईपोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे.

 

चित्रा वाघ यांचे संजय राठोडांसोबत मॉर्फ केलेले फोटो व्हायरल; मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे केली तक्रार

 

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी संजय राठोड यांच्यावर आक्रमकपणे टीका करणाऱ्या भाजपा महिला नेत्या चित्रा वाघ यांचा फोटो मॉर्फ केल्याप्रकरणी  राजकारण जबरदस्त तापले होते. या प्रकरणी चित्रा वाघ यांनी आज बीकेसी पोलीस ठाण्यात जाऊन सायबर विभागाच्या पोलीस उपायुक्त रेश्मी करंदीकर यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.फोटो व्हायरल झाल्यानंतर चित्रा वाघ यांनी फोटोंसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तक्रार केली होती. आता या प्रकारात मुंबईपोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे.

 

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने महाराष्ट्राचे राजकारण जबरदस्त तापले आहे. या मुद्द्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ, वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेत सातत्याने राज्य सरकारवर निशाणा साधत आहेत. मात्र, आता राठोडांसोबत त्यांचेच मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी त्यांनी मुंबई पोलिसांकडे कारवाईची मागणी केली होती असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडेही तक्रार केली होती. याशिवाय त्यांनी दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनाही माहिती दिली. 

राज्यात अन्याया विरोधात आवाज उठवणं गुन्हा झालाय का?

व्हायरल झालेल्या या मॉर्फ फोटोत चित्रा वाघ आणि संजय राठोड अगदी जवळ उभे असल्याचे दिसत आहेत. यासंदर्भात एका स्थानिक वृत्त वाहिनीशी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, "महाराष्ट्रात अन्यायाविरोधात आवाज उठवणे आता गुन्हा झाला आहे का? असे मला विचारायचे आहे. जे काम पोलिसांचे आहे, ते पोलिसांनी केले असते, जे काम सरकारचे आहे, ते काम सरकारने केले असते. तर आम्हाला त्या ठिकाणी बोलण्याची काय गरज होती? स्वतः काही करायचे नाही आणि अशा पद्धतीने फौज उभी करायची आणि हे तुम्ही बघितले मॉर्फ केलेले फोटो काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करताय तुम्ही? असा प्रश्नही चित्रा वाघ यांनी विचारला आहे.

...तोपर्यंत सहन करावेच लागणार वाघ म्हणाल्या, मला सातत्याने हॅरेसमेंट आणि धमकीचे फोन येत आहेत. त्याचे स्क्रीन शॉर्ट काढून मी डीजींसह सर्वांना पाठवत आहे. मी मुंबईच्या बाहेर जात असल्याने, जोपर्यंत मी गुन्हा दाखल करत नाही, तोपर्यंत कारवाई होणार नाही. मग तोपर्यंत मी हे सगळं सहन करायचं का? आणि माझा गुन्हा काय, तर जिथे अन्याय झाला तिथे आवाज उठवत आहे. हा माझा गुन्हा आहे? असा सवालही त्यांनी यावेळी केला. याबाबत काळाचौकी पोलिसांनी चित्रा वाघ यांच्या घरी जाऊन याबाबत त्यांचा जबाब नोंदवला आहे.  

 

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमChitra Waghचित्रा वाघPoliceपोलिसMumbaiमुंबई