BJP leader Chitra Wagh morphed photo with sanjay rathod goes viral complaint to cm and home minister | चित्रा वाघ यांचे संजय राठोडांसोबत मॉर्फ केलेले फोटो व्हायरल; मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे केली तक्रार

चित्रा वाघ यांचे संजय राठोडांसोबत मॉर्फ केलेले फोटो व्हायरल; मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे केली तक्रार

ठळक मुद्दे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने महाराष्ट्राचे राजकारण जबरदस्त तापले आहे.राठोडांसोबत चित्रा वाघ यांचे मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहेयाप्रकरणी त्यांनी मुंबई पोलिसांकडे कारवाईची मागणी केली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडेही तक्रार केली आहे.

मुंबई -पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने महाराष्ट्राचे राजकारण जबरदस्त तापले आहे. या मुद्द्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh), वनमंत्री संजय राठोड ( Sanjay Rathod) यांचे नाव घेत सातत्याने राज्य सरकारवर निशाणा साधत आहेत. मात्र, आता राठोडांसोबत त्यांचेच मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी त्यांनी मुंबई पोलिसांकडे कारवाईची मागणी केली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडेही तक्रार केली आहे. याशिवाय त्यांनी दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनाही माहिती दिली आहे. (BJP leader Chitra Wagh morphed photo with Sanjay Rathod goes viral complaint to cm and home minister)

त्यादिवशी मोबाईलवर संजय राठोडचे 45 मिस्ड कॉल होते, चित्रा वाघ पुन्हा कडाडल्या 

राज्यात अन्याया विरोधात आवाज उठवणं गुन्हा झालाय का?
व्हायरल झालेल्या या मॉर्फ फोटोत चित्रा वाघ आणि संजय राठोड अगदी जवळ उभे असल्याचे दिसत आहेत. यासंदर्भात एका स्थानिक वृत्त वाहिनीशी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, "महाराष्ट्रात अन्यायाविरोधात आवाज उठवणे आता गुन्हा झाला आहे का? असे मला विचारायचे आहे. जे काम पोलिसांचे आहे, ते पोलिसांनी केले असते, जे काम सरकारचे आहे, ते काम सरकारने केले असते. तर आम्हाला त्या ठिकाणी बोलण्याची काय गरज होती? स्वतः काही करायचे नाही आणि अशा पद्धतीने फौज उभी करायची आणि हे तुम्ही बघितले मॉर्फ केलेले फोटो काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करताय तुम्ही? असा प्रश्नही चित्रा वाघ यांनी विचारला आहे.

...तोपर्यंत सहन करावेच लागणार -
वाघ म्हणाल्या, मला सातत्याने हॅरेसमेंटचे फोन येत आहेत. त्याचे स्क्रीन शॉर्ट काढून मी डीजींसह सर्वांना पाठवत आहे. मी मुंबईच्या बाहेर जात असल्याने, जोपर्यंत मी गुन्हा दाखल करत नाही, तोपर्यंत कारवाई होणार नाही. मग तोपर्यंत मी हे सगळं सहन करायचं का? आणि माझा गुन्हा काय, तर जिथे अन्याय झाला तिथे आवाज उठवत आहे. हा माझा गुन्हा आहे? असा सवालही त्यांनी यावेळी केला. 

“वाघ आहोत अशा डरकाळ्या फोडण्यापेक्षा चित्रा वाघ यांच्यासारखी ‘वाघा’ला साजेशी भूमिका घ्या”

त्यादिवशी मोबाईलवर संजय राठोडचे 45 मिस्ड कॉल होते - 
सॅमसंग गॅलक्झी एस10 लाईट ग्रे कलरचा फोन आहे, या फोनच्या डिस्प्लेवर 45 कॉल हे संजय राठोडचे दिसत आहेत. ज्या दिवशी पूजा चव्हाणची आत्महत्या झाली, त्याचदिवशी हे 45 मिस कॉल्स आले होते, याचं स्पष्टीकरण पोलीस देणार आहेत का, असा प्रश्न चित्रा वाघ यांनी एका स्थानिक वृत्त वाहिनीशी बोलताना विचारला. मग, हा संजय राठोड कोण आहे, हेही पोलिसांनी सांगाव. पुणे पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, पोलीस महासंचालकांनी हा तपास पुणे पोलिसांकडून काढून घेऊन, एका सक्षम आयपीएस अधिकाऱ्याकडे देण्यात यावा, अशी मागणीही चित्राव वाघ यांनी केली.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: BJP leader Chitra Wagh morphed photo with sanjay rathod goes viral complaint to cm and home minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.