शहरं
Join us  
Trending Stories
1
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
2
प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतीकार? सुनेत्रा पवार-पार्थ पवार यांच्यासोबत पार पडली बैठक
3
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
4
Twisha Sharma : MBA, योगा ट्रेनर, मॉडेल-अ‍ॅक्टर होती ट्विशा शर्मा; ज्या तारखेला लग्न झालं, त्याच दिवशी जग सोडलं
5
महागाईचा आणखी एक झटका! पेट्रोल-डिझेल अन् दुधानंतर आता मुंबईत ब्रेडचे दर वाढले
6
Sex Racket: नोकरीचं आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ढकललं; ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ६ जणींची सुटका!
7
पुतिन यांच्या चीन दौऱ्याचा मोठा गेमप्लॅन; जिनपिंग यांच्याकडून 'या' महाप्रकल्पाला मंजुरी मिळवणार!
8
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
9
भारती सिंह घटस्फोट घेणार? हर्ष लिंबाचियासोबत बिनसल्याच्या चर्चांवर म्हणाली, "आम्ही दोघं..."
10
ना पोलीस आले, ना जागेवर तपास झाला; महत्त्वाचे पुरावेही गायब! ट्विशा शर्मा मृत्यूप्रकरणात उभे राहिले ३ मोठे प्रश्न
11
हृदयद्रावक! कारच्या मागच्या सीटवर झोपलेल्या नातीला आजोबा विसरले; गुदमरून चिमुकलीचा मृत्यू
12
Petrol Diesel Price Hike: हळूहळू खिशावर वाढणार 'भार', पेट्रोल-डिझेल दर वाढवण्यासाठी २०२२ चा फॉर्म्युला?
13
Vastu Tips: बेडरूममध्ये नकारात्मकता जाणवतेय? 'हे' तीन वास्तू उपाय मिळवून देतील मन:शांती 
14
Twisha Sharma : 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR
15
मंदिरांमधील सोन्यावर सरकारचा डोळा? सोशल मीडियावरील दाव्यामुळे खळबळ; सरकारने दिले स्पष्टीकरण
16
"मी AC मध्ये बसून तमाशा बघू शकत नाही...!" बंगालमधील 'नमाज बॅन'वर काय म्हणाले मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी
17
Numerology: तुमचा मोबाईल नंबर तुमच्यासाठी लकी आहे की अनलकी? मूलांकानुसार 'या' चुका टाळा
18
गाडीला अचानक हादरा देणारे Rumble Strips कशासाठी असतात, तुम्हाला माहितीये का?
19
हुंड्यामुळे ३३ वर्षीय अभिनेत्रीची आत्महत्या, प्रेग्नंट असतानाच संपवलं जीवन; अभिनेत्याला बसला धक्का, म्हणाला-"तिचं लग्न झालंय हेच..."
20
IPL Playoff Scenario: आरसीबी, एसआरएच, गुजरात प्लेऑफमध्ये; आता एका जागेसाठी ५ संघांमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत!
Daily Top 2Weekly Top 5

छोटा राजनला पुन्हा जन्मठेपेची शिक्षा; जया शेट्टी हत्येप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 08:06 IST

२०१५ मध्ये छोटा राजनला बालीहून भारतात आणण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर नोंदविण्यात आलेले ७१ गुन्हे सीबीआयकडे वर्ग करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्येप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयानेछोटा राजनला गुरुवारी दोषी ठरवित जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. २३ वर्षांपूर्वी जया यांची हत्या करण्यात आली होती. ज्येष्ठ पत्रकार जे. डे. यांची हत्या केल्याप्रकरणी छोटा राजनला या आधी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

२०१५ मध्ये छोटा राजनला बालीहून भारतात आणण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर नोंदविण्यात आलेले ७१ गुन्हे सीबीआयकडे वर्ग करण्यात आले. त्यापैकी एक जया शेट्टीची हत्येचे एक प्रकरण आहे. विशेष न्यायालयाचे न्या. ए. एम. पाटील यांनी छोटा राजनला जया यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवित जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

छोटा राजन सध्या दिल्लीतील तिहार कारागृहात आहे. बालीमधून भारतात आणण्यात आल्यापासून त्याला तिहार कारागृहात ठेवण्यात आले आहे. मुंबईला आपल्या जीवाला धोका आहे, असे म्हणत त्याने मुंबईत येण्यास नकार दिला.

काय आहे प्रकरण?

  • मध्य मुंबईत असलेले गोल्डन क्राऊन हॉटेलचा मालक जया शेट्टी होता. त्याला खंडणीसाठी छोटा राजनच्या गँगचे धमकीचे फोन येत होते. 
  • दि. ४ मे २००१ या दिवशी छोटा राजनच्या गँगमधील दोन माणसे थेट त्यांच्या हॉटेलमध्ये घुसले. त्यांनी शेट्टीची हत्या केली. शेट्टीच्या जीवाला धोका असल्याने पोलिसांनी त्याला सुरक्षा पुरविली होती. त्याच्या हत्येचा दोनच महिन्यांपूर्वी त्याचे संरक्षण काढण्यात आले होते.
टॅग्स :Chhota Rajanछोटा राजनLife Imprisonmentजन्मठेपCBIगुन्हा अन्वेषण विभागCourtन्यायालय