शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
2
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
3
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
4
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
5
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
6
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
7
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
8
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
9
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
10
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
11
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
12
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
13
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
14
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
15
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
16
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
17
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
18
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
19
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
20
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पतीच्या कमाईवर पत्नी प्रियकरासोबत करायची मज्जा; टॉर्चरला कंटाळून पतीने जीवन संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 17:39 IST

सुरुवातीला पती-पत्नी करधनी परिसरातील वैघजी चौकात राहत होते. त्याचवेळी चंचल आणि राकेशची ओळख झाली

जयपूर - राजस्थानच्या जयपूर येथे १० महिन्यापूर्वी पतीने केलेल्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर यांना अटक केली आहे. पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराने छळलेल्या मृत्यूला कवटाळलं असल्याचे तपासात समोर आले. लग्नाच्या काही काळानंतरच पत्नीने पतीपासून अंतर राखले आणि प्रियकरासोबत मिळून पतीचा छळ करू लागली. पत्नीकडून होणारा टॉर्चर सहन न झाल्याने अखेर पतीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलले. 

ऑगस्ट २०२४ मध्ये केली होती आत्महत्या

माहितीनुसार, माँ वैष्णोदेवी कॉलनीत राहणाऱ्या ३२ वर्षीय प्रकाश शर्माने १३ ऑगस्ट २०२४ रोजी आत्महत्या केली होती. तपासात त्याची पत्नी चंचल शर्मा आणि राकेश सैनी नावाच्या युवकाचे अफेअर सुरू असल्याचे पुढे आले. २०१७ साली प्रकाशचं चंचलसोबत लग्न झाले होते. लग्नाच्या काही दिवसानंतरच पत्नी चंचलने पती प्रकाशपासून अंतर राखले. तिने प्रियकर राकेशसोबत मिळून पतीचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. 

सुरुवातीला पती-पत्नी करधनी परिसरातील वैघजी चौकात राहत होते. त्याचवेळी चंचल आणि राकेशची ओळख झाली. प्रकाशने त्याला विरोध केला असता चंचलने राकेशसोबत मिळून त्याला मारहाण केली होती. इतकेच नाही तर प्रकाशचा सगळा पगारही चंचल राकेशच्या बँक अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करत होती. १३ ऑगस्टच्या दिवशी चंचलने प्रकाशच्या खात्यावरून ३६ हजार रुपये राकेशच्या बँक खात्यात पााठवले आणि त्याला आणखी ३ लाख पाठवण्यासाठी दबाव आणला. या छळाला कंटाळून प्रकाशने विष प्यायले. त्याची तब्येत ढासळली तेव्हा त्याला चिरायु हॉस्पिटलमध्ये आणले गेले. त्यानंतर तिथून मणिपाल रुग्णालयात नेत त्याच्यावर उपचार केले परंतु उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, या प्रकरणात मृत प्रकाशच्या आईने ३ जानेवारी २०२५ रोजी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला तेव्हा पत्नीच्या जबाबात विरोधाभास आढळला. पत्नीने राकेशच्या बँक खात्यावर पैसे पाठवल्याचे पुरावेही समोर आले. त्याच आधारे ६ जून रोजी चंचल आणि राकेश या दोघांना पोलिसांनी अटक केली. 
 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी