शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
7
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
8
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
9
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
10
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
11
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
12
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
13
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
14
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
15
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
16
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
17
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
19
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
20
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं

धक्कादायक! परभणीतील सेलू नगरपालिकेच्या कचरा डेपोतील खड्ड्यात सापडला मुलाचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2021 7:57 PM

नगर परिषद विरोधात गुन्हा दाखल करून पिडीत कूटुंबाला मदत देण्यासाठी नागरीकांचा मृतदेहासह पोलीस ठाण्यात ठिय्या.

देवगावफाटा (परभणी): सेलू नगर पालीकेच्या कचराडेपो मधील कचरा कुजवण्याण्यासाठी असलेल्या खड्यात शुक्रवारी ३:४५ वा सुमारास एका ९ वर्षीच्या मुलाचा मृतदेह सापडला.त्यानंतर न.प.विरोधात गुन्हा दाखल करून या पिडीत कुटुंबाला मदत मिळावी या मागणीसाठी या मुलाचा मृतदेह सेलू पोलीस ठाण्यात आणला.काही काळ येथे तणाव निर्माण झाला.पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांनी दोषीविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेवविच्छेदनसाठी हा मृतदेह रुग्णवाहिकातुन उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.रिहान शेरखाँ पठाण असे मयत मुलाचे नांव आहे.

सेलू शहराच्या पुर्वेकडील भागात घिसेखाँन नगर व राजमोहल्ला परिसरात नगर परिषदेचा कचरा डेपो आहे.शहरातील सर्व कचरा घंटागाडीतून येथे टाकला जातो.येथे कचरा कुजण्यासाठी १२ बाय २० आकाराचा मोठा खड्डा आहे.त्यात पाणी कचरा व मोठी घाण आहे.याखड्यात शुक्रवारी ३:४५ वा.रिहान शेरखाँ पठाण (वय ९वर्ष) चा मृतदेह सापडला.या प्रकारामुळे घटनास्थळी नगर पलिकेच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी सुरू होती.

शेरखाँ पठाण हे आपले कुटुंबासह सेलू येथे १४ वर्षापासून वास्तव्य करतात. हे कुटुंब कचराडेपो परिसरात अजीज पठाण यांचे विटभट्टीवर काम करतात. त्या बाजुला एका पतराच्या शेड मध्ये हे राहतात.घटनेच्या आदल्या दिवशी म्हणजे गुरूवारी दिवाळी सणाच्या दिवशी रिहान पठाण हा शेळी बघण्यासाठी घराबाहेर पडला.पण तो रात्री परत न आल्याने कुटुंबातील सदस्यांनी त्याचा शोध घेतला पण मिळून तेंव्हा नातेवाईक यांनी दुसऱ्या दिवशी शोध घेतला अखेर शुक्रवारी दुपारी ३ वा.रियान पठाण हरवल्याची तक्रार देण्याची प्रक्रिया सेलू पोलीस ठाण्यात सुरु असतांना.या दरम्यान कचरा डेपोच्या खड्यात रिहान पठाण चा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाली.त्यानंतर घटनास्थळी पोलीस निरिक्षक रावसाहेब गाडेवाड,पोउपनी साईनाथ अनमोड ,पो.ना सुनील वासलकर  हे कर्मचाऱ्यांसह दाखल झाले त्यांनी पंचनामा केला.यादरम्यान न.प.प्रशासनाला हा कचरा डेपो ईतरत्र हलवावा याबाबत ४० वेळा निवेदन देऊनही याकडे न.प.ने दुर्लक्ष केल्याने या प्रकाराला नगर पलिका प्रशासन दोषी आहे .या संतप्त भावनेतून नागरीकांनी हा मृतदेह रुग्णवाहिक येईपर्यंत  पोलीस ठाण्यात ५:१० वा. आणला.नंतर न.प.विरोधात गुन्हा दाखल करा व पिडीत कुटुंबीयाला आर्थिक मदत द्या तोपर्यंत शेवविच्छेदन होणार नाही असा पवित्र नागरिकांनी घेतला.यावेळी पो.नी.रावसाहेब गाडेवाड यांनी दोषीविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ५:३५ वा.मृतदेह शेवविच्छेदन साठी रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.

दुर्गंधी व धुराने नागरीक त्रस्त...

घिसेखाँननगर  व राजमोहल्ला परिसरालगत सेलू नगर पालीकेचा मोठा कचरा डेपो आहे.विशेषतः येथे रस्त्यावर व ईतरत्र कचरा आस्थाव्यस्थ पडलेला आहे या परिसरात नेहमी धुर व दुर्गंधी असल्याने याचा नागरीकांना त्रास होत आहे. तो कचराडेपो ईतरत्र हलवावा अशी या भागातील नागरीकांनी ४० वेळा निवेदन देऊनही याकडे न.प.ने दुर्लक्ष केल्याने यावेळी संतापजनक भावना व्यक्त होत होत्या. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीParbhani Municipal Corporationपरभणी महानगरपालिका