मोठा अपघात टळला; बसवर कोसळला मेट्रोचा खांब
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 15:37 IST2018-08-16T15:37:19+5:302018-08-16T15:37:55+5:30
मात्र सुदैवाने जीवितहानी झालेली नाही की कोणी जखमी झालेलं नाही.

मोठा अपघात टळला; बसवर कोसळला मेट्रोचा खांब
मुंबई - कांदिवलीच्या आज दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास 711क्रमांकाच्या बेस्ट बसवर मेट्रो खांब कोसळला. मात्र सुदैवाने जीवितहानी झालेली नाही की कोणी जखमी झालेलं नाही. कांदिवलीतील मेट्रो खांबाची उभारणी आणि तयार केला जाणारा लोखंडाच्या सळ्याचा खांब कोसळून हा अपघात झाला.
मुंबईत अनेक ठिकाणी मेट्रोचं काम सुरु आहे. कांदिवलीतही काम सुरु असताना मेट्रो खांब उभारण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लोखंडाच्या सळ्या असलेला खांब बसवर पडला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही. अपघातानंतर काही वेळासाठी वाहतुकीवर परिणाम झाला होता. दरम्यान, अपघातस्थळी वाहतूक पोलीस यांनी येऊन अपघाताबाबत माहिती गोळा केली असून अपघात कशामुळे झाला याची पाहणी केली जात आहे.