शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
3
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंबपरला कार धडकली, ८ जण ठार
4
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
5
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
6
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
8
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
9
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
10
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
11
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
12
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
13
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
14
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
15
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
16
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
17
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
18
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
19
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
20
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य

सावधान! आता हॉटेलमध्येही सुरू झाले स्किमिंग, अवघ्या ५०० रुपयांत होते गोपनीय माहितीची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 7:55 AM

skimming : गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, एचडीएफसी बँकेचे उपव्यवस्थापक यांच्या तक्रारीनुसार, बँक खातेदारांंनी कुठलीही माहिती शेअर केली नसतानाही नोव्हेंबर २०२० ते जानेवारी २०२१ दरम्यान त्यांच्या खात्यातून पैसे जाण्याच्या तक्रारी वाढल्या.

मुंबई : तुम्हीही हॉटेलमध्ये डेबिट, क्रेडिट कार्डने व्यवहार करीत असाल तर सावधान. कारण अशाच हॉटेलमध्ये तुमच्या कार्डचे स्किमिंग होत असल्याची धक्कादायक माहिती गुन्हे शाखेच्या कारवाईत उघडकीस आली आहे.  यात हॉटेलचा मॅनेजरच स्किमर मशीनच्या मदतीने ग्राहकांच्या डेबिट, क्रेडिट कार्डची माहिती मिळवून त्याची विक्री करत होता. या प्रकरणी हॉटेल मॅनेजरसह चौघांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, एचडीएफसी बँकेचे उपव्यवस्थापक यांच्या तक्रारीनुसार, बँक खातेदारांंनी कुठलीही माहिती शेअर केली नसतानाही नोव्हेंबर २०२० ते जानेवारी २०२१ दरम्यान त्यांच्या खात्यातून पैसे जाण्याच्या तक्रारी वाढल्या. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. त्यानुसार गुन्हे शाखेच्या कक्ष ९ चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने संबंधित खातेधारकांकडे चौकशी केली. तेव्हा त्यातील कार्डधारकांनी अंधेरी येथील महाकाली केव्हज रोडवरील हॉटेलमध्ये कार्डद्वारे व्यवहार केल्याची माहिती समोर आली. हाच धागा पकडून गुन्हे शाखेच्या कक्ष ९ च्या पथकाने हॉटेलवर छापा मारला. तेव्हा मालकाकडे केलेल्या चौकशीत अशाच प्रकारे संशयास्पद व्यवहार करणाऱ्या मॅनेजर यशवंत राजेश गुप्ता उर्फ सोनू (२३)ला कामावरून काढल्याचे सांगितले. मात्र तो साथीदारांना भेटण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली.  त्यानुसार पथकाने सापळा रचून मॅनेजर सोनूसह साथीदार अजहरुद्दीन अन्सारी (२२), इस्तियाक जमाल अहमद खान (२२) यांना बुधवारी अटक केली. अटक आरोपींच्या चौकशीतून यामागील मुख्य सूत्रधार मोहम्मद फैज कमर हुसेन चौधरी (२७) यालाही गुरुवारी अटक करण्यात आली. तो जोगेश्वरीचा रहिवासी आहे. त्यांच्याकडून एक स्किमर, ९ मॅग्नेटिक स्ट्रिप, ७ डेबिट कार्ड, ३ मोबाइल फोन  आणि २७ हजार रुपयांची रोकड मिळून आली.

अशी करायचे माहितीची चोरीजेवणाची ऑर्डर दिल्यानंतर जे ग्राहक डेबिट किंवा क्रेडिट कार्डने व्यवहार करणार असतील त्यांचे कार्ड आधी काउंटरकडे आणून देण्यास मॅनेजर सोनू सांगायचा. त्यानुसार  तेथील वेटर कार्ड सोनूकडे आणून देत. त्यानंतर सोनू हा त्याच्या जवळील स्किमर मशीनमध्ये कार्ड स्वॅप करून ती माहिती उतरवून घेत असे. त्यानंतर ते कार्ड आणि स्वॅप मशीन घेऊन ग्राहकाकडे जायचा. ग्राहकाने त्यात पिन टाकताच सोनू तो पिन नोंद करून घेत असे. पुढे व्यवहाराची वेळ आणि त्यापुढे तो पीन क्रमांक लिहून ठेवत असे. पुढे हा सर्व डाटा चौधरीला देत होता. चौधरीनेच त्याला ती स्किमर मशीन दिली होती.

पोलिसांनी केले दुर्लक्षसंबंधित हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटरने मॅनेजरच्या संशयास्पद वागण्याबाबत मालकाकडे  तक्रार केली होती. मालकाने पोलिसांकड़ेही धाव घेतली. त्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचेही समोर आले.

चौधरीला ३ वेळा अटकचौधरी हा सराईत गुन्हेगार असून त्याला ३ वेळा अटक करण्यात आली आहे. मुंबईतील ओशिवरा, खेरवाड़ी पोलीस ठाण्यासह राज्यभरात त्याच्याविरुद्ध गुन्हे नोंद आहेत. 

५०० रुपयांत विक्रीसोनूला एका कार्डमागे ५०० रुपये मिळत होते. कार्डची माहिती हातात आल्यानंतर चौधरी बनावट कार्डवर ती उतरवून घेत असे. पुढे त्या बनावट डेबिट कार्डद्वारे पुणे, सातारा येथील एटीएम मधून पैसे काढत होते. तेथील सीसीटीव्ही मध्ये ते पैसे काढताना दिसून आले आहेत. अशात बँक हॉलिडेच्या एक दिवस आधी हे व्यवहार करायचे. जेणेकरून खातेदार पैसे थांबवू शकणार नाही

तुमच्याही खात्यातून पैसे गेले का?तुम्हीही या टोळीच्या जाळयात अडकलात असाल तर  तक्रार करण्यासाठी पुढे या असे आवाहनही गुन्हे शाखेने केले आहे.

 स्किमिंग म्हणजे काय?- स्किमिंगच्या मदतीने कार्ड धारकाची माहिती चोरली जाते. यासाठी ‘स्कीमर’ या उपकरणाचा वापर करण्यात येतो. ‘स्कीमर’ हे एक छोटे यंत्र असून एटीएममध्ये कार्ड टाकण्याच्या जागेवर ते लावले जाते. एटीएमच्या स्लॉट सारखेच हे उपकरण असल्याने ते निदर्शनास येत नाही. ग्राहक अशा ‘स्कीमर’ लावलेल्या मशीनमधून- व्यवहार करतात, तेव्हा त्यांच्या कार्डची संपूर्ण माहिती ‘स्कीमर’मध्ये साठवले जाते. आरोपी त्या माहितीपासून बनावट (क्लोन) एटीएम कार्ड तयार करून रक्कम काढून घेतात. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई